*कन्हान नगरीत आमदार आशिष जयस्वाल यांचे शिवसैनिकांनी केले स्वागत*
*शिवसैनिक पदाधिकार्यांन मध्ये उत्साह चे वातावरण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकी झाल्यानंतर राजकारणा मध्ये मोठा भुकंप आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन बंडामध्ये उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपा समर्थित शिंदे सरकार स्थापित झाले असुन या सरकार ला रामटेक विधानसभा क्षेत्रातुन अपक्ष निवडुन आलेले आमदार आशिष जयस्वाल यांनी पांठिबा दिला आहे . मंगळवार ला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांचे कन्हान नगरीत आंबेडकर चौक येथे आगमन होताच त्यांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . त्यानंतर शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या नेतृत्वात आमदार आशिष जयस्वाल यांच्या ढोल ताश्याचा गजरात , फटाके फोडुन , मिठाई घालुन , व पुष्प गुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले .

या प्रसंगी या प्रसंगी महिला उप जिल्हा प्रमुख शुभांगी घोगले , शिवसेना शहर प्रमुख छोटू राणे , महिला शहर प्रमुख मनीषा चिखले , बंड मामा , चिंटू वाकुडकर , हरीश तिडके , निंकू पिल्ले , मनोज बैतवार , संजय शेंद्रे , समशेर पुरवले , भारत पगारे , अर्जुन पाते , प्रदीप गायकवाड , चिंटू पिल्ले , योगी पिल्ले , सन्नी पिल्ले , गणेश भालेराव , मेघा लुंढूरे , अजय चौहान , कुंदा मोडघरे , लीना हारोडे, नीतू तिवारी , लता लुंढुरे , कोमल लांजेवार , रायकवार ताई , वनिता मेश्राम , वैशाली श्रीखंडे , वैशाली थोरात , सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज