Breaking News

*पारशिवनी डुमरी (कला) शिवारात कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा प्रेत मिळुन आला* *परिसरात खळबळ , हत्या कि आत्महत्या पारशिवनी पोलीस द्वारे तपास सुरु*

*पारशिवनी डुमरी (कला) शिवारात कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा प्रेत मिळुन आला*

*परिसरात खळबळ , हत्या कि आत्महत्या पारशिवनी पोलीस द्वारे तपास सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी (कला) शिवारात एका अज्ञात इसमाचा प्रेत मिळुन आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे . सदर घटनेची माहिती पारशिवनी पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता पारशिवनी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवुन पोस्टे ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरून मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक ९ जुलाई ला सकाळी ८:०० वाजता च्या दरम्यान मौजा डुमरी ( कला ) शिवार येथे वय अंदाजे ६० ते ६५ वयोगटाच्या इसमाचे प्रेत डुमरी ( कला ) शिवारातील कॅनल शेजारील नाल्याचे पाण्यात बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे ला मर्ग क्रमांक ३२/२२ कलम १७४ जाफौ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


मृतकाचे वर्णन असे कि उंची – ५ फुट ४ इंच – अंगात पांढऱ्या रंगाची मळकट बनियान व पांढऱ्या रंगाचे मळकट धोतर , गळ्यात काळा करदोडा आहे . गोंधन – – मृतकाचे उजव्या हातावर प्रथम अक्षर अस्पष्ट असुन त्यानंतर धोंडु कावळे असे गोंदलेले , हाताचे | बोटात तांब्याच्या धातुची आंगठी आहे . वरील वर्णनाचा इसम आपले पो.स्टे . हद्दीतुन बेपत्ता असल्यास पो.स्टे . पारशिवनी येथे खालील क्रमांकांवर संपर्क साधावा (1) 07102225123 (2) पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे 7020577459 (3) पोलीस हवालदार रवि बर्वे 8830565076 असे कडकडीचे आव्हाहन पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी केले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …