Breaking News

*ठेकेदार व नप प्रशासना च्या दुर्लक्षमुळे रोडावर पावसाचे पाणी जमा होत असल्याने नागरिक त्रस्त* *रोड लेवल करुन समस्या त्वरीत सोडविण्याची नागरीकांची नप प्रशासनाला मागणी*

*ठेकेदार व नप प्रशासना च्या दुर्लक्षमुळे रोडावर पावसाचे पाणी जमा होत असल्याने नागरिक त्रस्त*

*रोड लेवल करुन समस्या त्वरीत सोडविण्याची नागरीकांची नप प्रशासनाला मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सात स्वामी विवेकानंद नगर येथील पटवारी आॅफिस कार्यालय कडे जाणाऱ्या पांधर महामार्गा वर सतत होत असलेल्या पावसाचे पाणी जमा झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या व तेथील रहिवासी नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असल्याने नगर परिषद प्रशासन विरुद्ध नागरिकांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाले आहे .
शहरातील स्वामी विवेकानंद नगर प्रभाग क्रमांक सात येथील रहिवासी किसन उरकुडा सांगोडे व इतर नागरिकांचा घरासमोर मागील दोन वर्षा पुर्वी एप्रिल महिन्यात पांधन रोडाचे निर्माण करण्यात आले होते . ह्या रोड चे निर्माण कार्य ठेकेदार सुशिल जवाहर गुप्ता यांनी केले असुन ह्या कार्यात ठेकेदारांनी काम करतांना कोणत्याही प्रकारचे लेवल न मिळवल्याने व लापरवाही केल्याने रोडावर सतत होत असलेल्या पावसाचे पाणी जमा झाले आहे . ही समस्या मागील दोन वर्षापासुन असुन नागरिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासना ला पत्र व्यवहार केल्या वर ही प्रशासना ने या कडे लक्ष केंन्द्रीत केले नाही . त्यामुळे परिसरात मच्छरांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना डेंगू सारख्या घातक बीमाऱ्या होत असल्याने नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे .
रोड चे निर्माण कार्य करते वेळी किसन सांगोडे यांच्या घरासमोरील व्यक्तीने आपल्या गल्लीतुन नाली बनविण्याची परवानगी दिली असुन रोड चे कार्य पुर्ण झाल्यावर व्यक्तीने आपल्या गल्लीतील नाली सिमेंट टाकुन बंद केल्याने रोडावर पाऊसाचे पाणी जमा झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या व तेथील रहिवासी नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासना ला पत्र व्यवहार करुन या गंभीर समस्या कडे लक्ष केंन्द्रीत करुन तात्काळ ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे .


या प्रसंगी माजी नप नगराध्यक्षा अॅड आशा पनिकर , किसन सांगोडे , गणेश बुंदेलिया , अमोल सांगोडे , राहुल बावने , भावना बोरकर , माया चनकापुरे , पांडुरंग दाखोडे , ताराबाई बोरकर , रजनी परते , विजय दाखोडे , बंटी बुंदेलिया , सविता राऊत , शिला बावने , लक्ष्मी बावने , नरेंद्र बोरकर , ज्ञानीधर चनकापुरे , सह आदि नागरिकांनी केली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …