*कन्हान पोलीस स्टेशन येथे लाॅज मालक व्यवस्थापक ची बैठक संपन्न* *पुर्णपणे खात्री झाल्याशिवाय प्रवेश देऊ नये लाॅज मालक व्यवस्थापक यांना पोलीस निरीक्षकांचे आव्हाहन*

*कन्हान पोलीस स्टेशन येथे लाॅज मालक व्यवस्थापक ची बैठक संपन्न*

*पुर्णपणे खात्री झाल्याशिवाय प्रवेश देऊ नये लाॅज मालक व्यवस्थापक यांना पोलीस निरीक्षकांचे आव्हाहन*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – सावनेर येथील केशव लाॅज मध्ये २७ वर्षीय युवकाच्या मृत्यु प्रकरणा नंतर नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन येथे लाॅज मालक व्यवस्थापक ची बैठक घेऊन विविध माहिती देऊन बैठक संपन्न करण्यात आली .


रविवार दिनांक ३ जुलाई ला सायंकाळी च्या दरम्यान सावनेर येथील केशव लाॅज मध्ये एका २७ वर्षीय युवकाच्या मृत्यु झाल्यानंतर एकच खळखळ उडाली होती . सदर घटनेला गंभीर्याने लक्षात घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन ला बैठकीचे आदेश दिल्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन येथे शुक्रवार दिनांक ८ जुलाई ला दुपारी ११:३० ते १२:३० पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात लाॅज मालक व्यवस्थापक याची सभा आयोजित करण्यात आलेली हाेती . या बैठकी मध्ये पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी सावनेर येथे घडलेल्या घटनेची संबंधित सविस्तर माहिती दिली . तसेच लाॅज मध्ये काेणत्याही प्रकारचे गैरप्रकार चालणार नसुन पुर्णपने खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही व कायदा – सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हिव्जीट बुक सि. सि. टी. व्ही. कॅमेरे बाबत माहिती देण्यात आली . सदर नियमांचे सर्व लाॅज मालक व्यवस्थापक यांनी काटेकोर पणे पालन करावे असे आव्हाहन पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी केले आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …