*महिलेवर बलात्कार: आरोपीस अटक*

कळमेश्वर: पिडीत महिलेचा पाठलाग करून तीला रस्त्यावरील शेताच्या खड्डयात ओढून नेवून बलात्कार केला. ही घटना दि. 13 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. पप्पु शामराव उईके, वय 38 वर्ष, रा. योगेश भोपसे यांचे शेतात कोहळी ता. कळमेश्वर जि. नागपुर असे आरोपीचे नांव आहे.*
*मिळालेल्या माहिती नुसार 38 वर्षीय पीडित/फिर्यादी हिला आरोपी पप्पु शामराव उईके, वय 38 वर्ष, रा.योगेश भोपसे यांचे शेतात कोहळी ता. कळमेश्वर जि.नागपुर याने तिचा पाठलाग करून हिन्दीत ‘मुझे तेरे साथ सम्बंध बनाना है!’ असे म्हणून जबरदस्तीने आरोपीने फिर्यादी पिडीतेस ओढत नेवून रत्याचे कडेला खड्याात नेले. यानंतर आरोपीने फिर्यादी सोबत बळजबरीने बलात्कार करून जिवाने मारण्याची धमकी दिली.*
*सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपी विरुध्द कलम 376, 354(डी), 323, 506 भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि गेडाम करीत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज