*प्रहार विद्यार्थी संघटन तालुका कार्यकारणी चा विस्तार* *साटक जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी सागर पाटील व करंभाड जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी पंकज वरठी यांची नियुक्ती*

*प्रहार विद्यार्थी संघटन तालुका कार्यकारणी चा विस्तार*

*साटक जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी सागर पाटील व करंभाड जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी पंकज वरठी यांची नियुक्ती*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवणी तालुक्यात काही महिन्यानंतर ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातले असुन प्रहार विद्यार्थी संघटने ने तालुक्यातील विविध क्षेत्रात जिल्हा परिषद सर्कल स्तरीय कार्यकारणी पूर्ण करायला सुरुवात केली आहे . ही कार्यकारणी प्रहार नेते रमेश कारेमोरे यांचा आदेशानुसार तसेच पारशिवणी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिषेक एकूणकर यांचा नेतृत्वात होत असुन साटक जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी सागर पाटील , उपाध्यक्ष पदी उज्वल रचचोरे यांची नियुक्ती करण्यात आली असुन करंभाड जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी पंकज वरठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .निवडणूका मर्यादी पुरताच न राहता इतर ही सामाजिक विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी प्रहार संघटना काम करेल असे पारशिवणी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिषेक एकूणकर यांनी सांगितले आहे .


या प्रसंगी प्रहार विद्यार्थी संघटना पारशिवनी शहर अध्यक्ष तुषार सोनटक्के , खापरखेडा शहर अध्यक्ष सागर सरोदे , संकेत लाड राकेश दुधुके , स्वप्निल कोहडे , आकाश मेश्राम , शुभम ढेंगरे उपस्थित आदी होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …