Breaking News

*कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिदांना दिली श्रद्धांजलि* *कारगिल विजय दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिदांना दिली श्रद्धांजलि*

*कारगिल विजय दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे कारगिल विजय दिवस निमित्य येथे तारसा रोड शहिद चौक येथे शहिद प्रकाश रायभाण देशमुख यांच्या प्रतिमेला व शहिद स्मारका वर पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करुन कारगिल युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.२६) जुलै ला कारगिल विजय दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक ताराचंद निबांळकर , प्रभाकर रुंघे , प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हनुमान नगर कन्हान येथील शहिद प्रकाश रायभाण देशमुख यांच्या प्रतिमेला व शहिद स्मारका वर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी ताराचंद निबांळकर यांनी कारगिल युद्धा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून श्रद्धांजली अर्पित केली. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी शहिद प्रकाश देशमुख व शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून तसेच दोन मिनटाचा मौन धारण करून कारगिल युद्धात शहिद झालेल्या देशाच्या वीर जवानांना भावपुर्ण श्रद्धां जली अर्पित करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , हरीओम प्रकाश नारायण , आकाश पंडितकर , वैभव थोरात , प्रविण हुड , सुरेश आंबीलडुके , सुनिल हारोडे , हर्ष पाटील , जितु गजभिये , संतोष मिश्रा , रामाशिश केवट , सदानन विश्वकर्मा , केशव प्रकाश सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …