*गणेश नगरच्या पांधन रस्त्यावर झाड कोसळला*
*३ तास विद्युत बंद , जीवितहानी टळली*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – परिसरात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचे जन जीवन अस्त व्यस्त झाले आहे . फुटपाथ वर छोटी मोठी दुकाने लावुन स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दुकानदारांवर पावसाने कहर केला असुन परिसरात विविध भागातील रस्ते खड्डेमय झाले असुन नप प्रशासन मुंग गिळून गप्प बसल्याने तेथील खासदार, आमदारही त्यांच्या अडचणीत सापडले आहेत. शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर तारसा रोडवर वाहन चालवणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखी परिस्थिती झाली आहे. शिवसेना नेते चिंटू वाकुळकर यांच्या अथक प्रयत्नातून नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी रस्त्यावर सिमेंटचे दगड टाकून मोठे खड्डे बुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
रविवार ला सकाळी ६:३० वाजता च्या सुमारास गणेश नगर येथील विश्व ज्योति चर्च च्या समोर असलेला झाड़ कोसळल्याने रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. अर्जुन जैस्वाल यांची कार झाडाखाली उभी होती, त्यातून ते थोडक्यात बचावले. चर्चमधील साप्ताहिक प्रार्थना सेवेच्या काही वेळापूर्वी झाड पडले अन्यथा चर्चला येणाऱ्या अनेक लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले असते . झाड कोसळल्याने तीन तासा करिता विद्युत लाईन बंद पडली असुन काही वेळेकरिता मार्ग बंद करण्यात आले होते . सदर घटनेची माहिती नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ नगर परिषद च्या कर्मचार्यांना बोलावुन झाडाला कापुन मार्ग सुरु केला . मार्ग सुरु झाल्याने विद्युत विभागाने तीन तासा नंतर लाईन सुरु केल्याने नागरिकांना राहत मिळाली . शहरात अजून बरीच झाडे आहेत, जी पडण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील अशा झाडांची पाहणी करून ते तत्काळ हटविण्याची मागणी शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटू राणे दामोदर बंड, प्रदीप गायकवाड, हरीश तिडके, चिंटू वाकुळकर यांनी नप प्रशासनाला केली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज