*डिझेलचा भडका उडाल्याने तीन इसम गंभीर जख्मी*
*कामठी राणी तलाव मोक्षधाम येथे घडली धक्कादायक घटना*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान/ कामठी – नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत राणी तलाव मोक्षधाम येथे डिझेलचा भडका उडाल्याने तीन इसम गंभीर जख्मी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार स्थानिक मोदी पडाव नागसेन नगर येथील रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने या इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याने काल गुरुवार दिनांक २८ जुलै ला दुपार च्या सुमारास कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी उरकण्यात येत असतांना कार्यक्रमा दरम्यान मृतकाला अग्नी देतांना टेंबा लावून डिझेलचा भडका उडाल्याने कार्यक्रमात सहभागी झालेले सुधीर महादेव डोंगरे (४५), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (६०) दोघेही राहणार नागसेन नगर कामठी व दिलीप घनश्याम गजभिये (६०) रा. न्यू खलाशी लाईन कामठी हे तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहे .
सदर घटनेत दोघांची हालत चिंताजनक असल्याने त्यांना उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे भर्ती करण्यात आले असुन एका इसमांचा कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे सुरु आहे .
Maharashtra News Media सच की आवाज