*जेसीबी मधुन बॅटरी , लोहा व इतर सामान असा एकुण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*जेसीबी मधुन बॅटरी , लोहा व इतर सामान असा एकुण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या बोर्डा टोल नाका जवळ उभ्या असलेल्या जेसीबी मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने बॅटरी व इतर साहित्य सहित एकुण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी राजेंद्र हिरामन मदनकर हे बोर्डा टोल नाका जवळ कंस्ट्रक्शन साईट येथे सुपरवाइजर चे काम करत असुन त्या साईट वर जेसीबी उभी असुन त्या मध्ये लावलेली बॅटरी व कंस्ट्रक्शन बांधकाम करायचे सामान ३ सब्बल २० एमएम च्या दोन डाग , बारा एमएम च्या दोन डाग , आठ एमएम च्या दोन डाग , रिग माराचा ठिया एक , तीन हातोडी , करर्नी , रिगमारलेला लोहा साठा किलो , तुकडा स्कॅब ४० किलो माल ठेवलेला होता . रविवार दिनांक ३१ जुलै ला सकाळी १०:०० वाजता राजेंद्र हिरामन मदनकर हे साईट वर काम चालु झाले काय हे बघायला गेले असता तर तेथील काम करणारा मजुर नामे दुर्गेश याने सांगितले कि जेसीबी उभी असुन त्या मधील बॅटरी व कामाचे साहित्य कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले असावे जेसीबीचा लाॅक तोडलेला असुन बॅटरी काढुन घेतली आहे बॅटरीची किंमत अंदाजे ६,००० रुपए , इतर साहित्य व १०० किलो लोहा अंदाजे किंमत ६,५०० रुपए असा एकुण १२ ,५०० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी राजेंद्र मदनकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …