*आदर्श हायस्कुल आणि आयडियल कां.हि.प्रा.शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*
*देशाच्या सुरक्षते करिता आदर्श नागरिक निर्माण करावे – भरत सावळे यांचे शिक्षकांना आव्हाहन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – आदर्श हायस्कुल आणि आयडियल कां.हि.प्रा.शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव भरत सावळे यांच्या हस्ते व प्रमुख अतिथि भुतपुर्व सैनिक रमेश वांढरे , संस्थेचे उपाध्यक्ष लालजी बारई , माजी मुख्याध्यापक आनंदरावजी कावळे , प्रायमरी च्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये भारत माता व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भुतपुर्व सैनिक रमेशजी वांढरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
त्यानंतर रमेशजी वांढरे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थांना तिरंगा झेंडा व अशोक चक्र यांचे महत्व पटवुन सांगितले असुन माजी मुख्याध्यापक आनंदरावजी कावळे यांनी देशातील सर्व युवकांनी तसेच विद्यार्थांनी देशाच्या सुरक्षते करिता सज्ज राहण्याची आव्हान केले असुन संस्थेचे सचिव भरत सावळे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन स्वातंत्र्य प्राप्ती करिता क्रांती कारकांनी कसे बलिदान दिले या बाबतीत मार्गदर्शन करुन उपस्थित शिक्षकांना देशाच्या सुरक्षते करिता आदर्श नागरिक निर्माण करावे असे आव्हाहन केले .
कार्यक्रमाची प्रस्ताविका मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम यांनी मांडली .
या प्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी , पालकगण , कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन यादव सर यांनी केले तर आभार डोंगरे सर यांनी मानले .