*भारसिंगी येथे मनसे कडून प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान*
*काटोल व नरखेड मध्ये मनसे तर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आला*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना काटोल व नरखेड मनसेच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास वेग
भारसिंगी- भारसींगी येथे नरेश भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी 4:00 वाजता कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली या प्रसंगी नोंदणी स्वतः भ्रमणध्वनी वर सदस्यांना व कुटूंबियांना आणि ईतरही लोकांना करता यावी याकरिता प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
सदस्यनोंदणी प्रथत: उपस्थितीत साजरा करण्यात आला
सदस्य नोंदणी करता नागरिकांकडून खूपच चांगला प्रतिसाद् मिळाला. या कार्यक्रमा प्रसंगी नरेश भोयर यांनी सदस्यांना आपल्यासह कुटूंब ईतर मित्रपरिवार व प्रभागातील लोकांना पक्षासोबत जुळण्याकरिता सदस्य नोंदणी पुढेही अतीउत्साहात जोमाने सुरु राहील अशी माहिती दिली. या कार्यक्रमाकरीता नरेश भोयर जिल्हा उपाध्यक्ष नागपुर (ग्रामीण) विनोद नाखले, तालुका उपाध्यक्ष वसंत पाटील, तालुका सचिव साजिद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे रितेश कांहोलकर, उपसरपंच विजय बागडे, राजेंद्र बागडे पत्रकार, स्वप्नील खोपे, सागर वानखेडे, अमोल तायडे, अक्षय चक्रपाणी, विकास चक्रपाणी,अतुल खंडार, देवल धुळे, उज्वल मानेराव,चेतन सातपुते, अमोल सौदागर, मनीष गायधने, रतन तागडे, तसेच पक्ष प्रवेश झालेले कार्यकर्त्यांचे नाव मंगेश शेंद्रे, वसंतराव बहुरूपी, साहिल ढोकणे, वैभव मुंदाफळे, लंकेश वानखेडे, गोपाल वानखेडे, अभिजित मडके, मयूर भोयर, अमोल ढोपरे हर्षल जैन, उज्वल पाटील, इंद्र वलके, गौरव जैन, निलेश तुमाने, मनसेचे असंख्य पदाधिकारी व मनसेसैनिक आवर्जून उपस्थित होते.