*बेलोना येथे स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत काळमेघ यांच्या शेती मध्ये घेण्यात आली*
*शेतीशाळा , कापूस वेचनी पूर्व महाराणा प्रताप हॉल येथे देण्यात आले प्रशिक्षण*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
बेलोना – येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत दिनांक 06/09/2022 रोजी नामदेवराव काळमेघ यांच्या शेतावर शेतीशाळा घेण्यात आली व त्यानंतर महाराणा प्रताप सभागृह येथे वेचनी पूर्व प्रशिक्षण घेण्यात आले प्रमुख पाहुणे . एन. डि. बाबल मंडळ कृषी अधिकारी नरखेड , . ए . व्ही. रामटेके, कृषी सहाय्यक, आर.एस. खळतकर कृषी सहाय्यक, यांनी शेतकऱ्याला शेती बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना कापूस पीक परिसंस्था रोग किड नियंत्रण याविषयी संत्रा फडकी संत्रा गळ यावरती नियोजन कीटकनाशक फवारणी करताना आपली स्वतःची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहेत तसेच बदलत्या युगानुसार शेती करणे हे किती महत्त्वाचे आहेत शेतीला वेळेवर कुठले खत फवारणी करावी तसेच कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल कपाशी व संत्रा पिकावरील तसेच कृषी विभागाच्या विविध योजना यांच्या बद्दल माहिती दिली. नामदेवराव काळमेघ अध्यक्ष स्थान भूषवले असून उकेश चव्हाण माजी जिल्हा परिषद सभापती उपसरपंच किशोर चंदेल कमलाकर दिवाण शोभाराम सिंग चव्हाण प्रमुख पाहुण्या सोबत उपस्थित दर्शवली. पुरुषोत्तम थोटे यांनी प्रस्तावना केली तर अनिल डोईफोडे यांनी आभार मानले असून,
शेतकऱ्यांनी सत्ता पक्ष माझी जिल्हा परिषद सदस्य यांना झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत नुकसान व कापूस पीक त्यांच्या हातात देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली .
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पतंजली किसान सेवा समिती व सर्व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतीशाळा चर्चासत्रात सहभाग घेतला .