*नवेगांव खैरी पेंच धरणाचे सर्व १६ दरवाजे उघडले , कन्हान नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरुच*
*कन्हान नदी च्या पाणी पात्रात वाढ , नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नवेगांव खैरी पेंच धरणाचे सर्व १६ गेट मंगळवार ला सकाळ पासुन उघडल्याने कन्हान नदी पात्रात वाढ झाल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .
नागपुर जिल्ह्यात आणि पारशिवनी तालुक्यात दोन ते तीन दिवसा पासुन होत असलेल्या जोरदार पावसामुळे तोतलाडोह व नवेगांव खैरी पेंच धरण १००% भरल्याने मंगळवार ला सकाळ पासुन तोतलाडोह धरण आणि नवेगांव खैरी पेंच धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदी च्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे .
सध्या च्या परिस्थिति मध्ये तालुक्यात पाऊस सुरु असल्याने यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशी माहिती पेच पाटबंधारे विभागाचे उपविभागिय अभियंता सावरकर , कनिष्ठ अभियंता विशाल दुपारे यांनी दिली असुन परिस्थिति वर तहसीलदार प्रशांत सांगडे , तालुका विभागीय कृषी मंडळ अधिकारी श्री जी बी वाघ , गट विकास अधिकारी सुभाष जाधव , पारशिवनी पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक राहुल सोनवने , कन्हान पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक विलास काळे , हे लक्ष ठेवुन आहेत .