*पारशिवनी तालुक्यातील साटक आणि बखारी येथे लम्पीचा शिरकाव*
*१८६० गाई व बैलांचे केले लसीकरण , तर ६०० गाई बैलांचा कोठ्यात केली फवारणी*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
पारशिवनी :- जनावरांमध्ये आढळून येणार्या लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे. नागपुर जिल्ह्यातील सावनेर आणि हिंगणा येथे काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत . शुक्रवार ला पारशिवनी तालुक्यात ही लम्पी चा शिरकाव होऊन बखारी गावात दोन गाई व साटक गावात दोन गाई असे चार गाईंना लम्पी चा आजार झाल्याने जिल्ह्यात एकूण लम्पीसदृश आजार बाधित जनावरांची संख्या २४ वर पोहोचली आहे.
काही दिवसान पुर्वी नागपुर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सर्वप्रथम लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली होती. त्यानंतर हिंगण्यात या आजाराची सदृश जनावरे मिळून आली असुन आता पारशिवनी तालुक्यातील साटक गावात दोन व बखारी गावात दोन अशी या आजाराची चार जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले असुन
बाधित जनावरे मिळालेल्या भागातील ग्रामपंचायत बखारी , वाघोडा , नांदगांव , मेहंदी , गरंडा गवना , साटक , निमखेडा , डुमरी कला , बेलडोगरी , या गावत शुक्रवार आणि शनिवार पर्यंत१८६० गाई व बैलां चे लसीकरण करण्यात आले असून एकुण ६०० गाई बैलांचा कोठ्यात औषधी ची फवारणी करण्यात आली आहे .
पाच किलो मीटर च्या अंतरावरील परिसरातील जनावरांचे लसीकरण ही सुरू करण्यात आले आहेत. शासनाकडून १० हजार लसी मिळाल्या असून अतिरिक्त लशींची मागणी करण्यात आली आहे. पारशिवनी तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी , मुख्याधिकारी , एस डि ओ , तहसीलदार , बिडिओ , जिल्ह्याचे व तालुक्या चे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्यांकडे पोहोचले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यात साडेतीन हजारांवर लसी ही पाठविण्यात आले असुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी ही गावाला भेट देऊन उपाययोजनांची माहिती घेतली . आजाराची तीव्रता अधिक नसून तो नियंत्रणात असल्याने शेतकर्यांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांना सांगितले. तर यापूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळे कडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्रतीक्षेत असून , तो अहवाल हाती येताच या जनावरांना लम्पीचीच लागण झाली आहे की इतर आजाराची हे स्पष्ट होणार असल्याचे पशुसंवर्धन विभातील तालुका अधिकार्यांनी डाक्टर गणेश ठाकुर यांनी सांगितले.
पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर , बखारी चे सरपंच नरेश ढोणे , साटक ची सरपंच सिमा उकंडे , यांनी शेतकऱ्यांनी जनावरातील लंपी व्हायरस आजाराने घाबरू नये.
तसेस तालुकातील पशुवैधकिय अधिकारी डॉ.गणेश ठाकुर , डॉ. ए पी चिमोटे , डॉ. टेकाम , डॉ. प्रिती वाळके , डॉ बबिता मेश्राम, डॉ.पुजा काळे , डॉ.प्रिती सिरसाट , डॉ.सुरेश मांडलिक , डॉ.शिशुपाल मेश्राम , डॉ. नेवारे , सह पुर्ण टिम साटक व बखारी ग्राम पंचायत पासुन पांच किलो मीटर अंतर वरिल गाव बखारी, वाघोडा , नांदगाव, मेहदी , गरंज गवना, साटक, निमखेडा , डुमरी कला, व बेलडोगरी गावात लसिकरण व फवारणी करून गाई बैल यांची तपासणी करित आहे .