*शिव ऑटो वाहतुक सेने व्दारे मतीमंद महिलेस मदत करित तिच्या घरी पोहचविले*

*शिव ऑटो वाहतुक सेने व्दारे मतीमंद महिलेस मदत करित तिच्या घरी पोहचविले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड कांद्री टोल नाका परिसरात एक मतीमंद महिला भटकुन फिरत असल्याचे पाहुन सावजी भोजनालया चे संचालक किरण ठाकुर यांनी शिव ऑटो वाहतुक सेना कन्हान पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तिचा पत्ता शोधुन जयताळा नागपुर ला तिच्या घरी सुखरूप पोहचवुन नातेवाईकाच्या स्वाधिन करून मौलिक कार्य केले.
बुधवार (दि.१४) सप्टेंबर ला रात्री ९.३० वाजता दरम्यान नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड कांद्री टोल नाका परिसरात एक महिला भटकत फिरत असल्याचे दिसल्याने ठाकुर सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांनी कन्हान येथील शिव ऑटो वाहतुक सेनेचे पदाधिकारी सावन लोंढे , प्रकाश पात्रे , महेर विंचुरकर यांचेशी संपर्क करून मतिमंद महिलेची माहिती दिल्याने शिव ऑटो वाहतुक सेनेचे पदाधिकारी चार ऑटो सह लगेच त्या मतिमंद महिलेच्या मदतीला पोहचले , तिची जेवणाची व्यवस्था करून तिला विचारपुस केली असता महिला मांगगारूडी समाजाची जयताला नागपुर येथील रहिवासी असल्याचे कळताच सदर महिलेचा फोटो जयताळा च्या काही परिचित लोकांकडे वॉटशाप वर पाठवि ल्याने महिलेच्या नातेवाईकांची माहिती लगेच मिळता च त्यांना संपर्क साधुन तिची माहिती दिल्यावर त्यानी सांगितले की , सत्रापुर येथे नातेवाईक असल्याची सांगितल्याने त्या मतिमंद महिलेच्या सत्रापुर च्या परिचित महिलेच्या मदतीने जयताळा नागपुर ला तिच्या घरी नातेवाईकांकडे सुखरूप शिव वाहतुक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या ऑटोने रात्री ११.३० वाजता नि:शुल्क पोहचुन देण्यात आले. या कौतुकास्पद कार्यास किरण ठाकुर , उमेश पौनिकर , बादल लोंढे , महेर विंचुरकर , प्रकाश पात्रे , रोशन लोंढे , सावन लोंढे आदिं नी माणुसकी जपत मदत करून मौलिक कार्य केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …