*वारेगाव – कामठी मार्गावर ऑईस फॅक्ट्रीसमोर एका होटेलमध्ये चोरी*

*अज्ञात आरोपीने केला १९७०० रु.चा मुद्देमाल लंपास*
खापरखेडा प्रतिनिधी –
खापरखेडा – पोलीस स्टेशन हद्दीतील वारेगाव – कामठी मार्गावर ऑईस फॅक्ट्रीसमोर एका होटेलमध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार सुरेश हेमराज खडसे-३१ मु.वार्ड न.२ वारेगाव हे नेहमी दुकान बंद करून घरी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री नंतर मोटर्सच्या दक्षिणेकडील होटलचा पत्रा वाकवून आत प्रवेश केला.दरम्यान दुकानातील फ्रिज किंमत ८०००. खर्रा घोटण्याची मशीन किंमत ४०००, खतांचा दोन बोरी किंमत २४०० एचपी गॅस सिलेंडर किंमत २०००,रोख चिल्लर ३०० चाकलेट,पत्नी,खर्राचे सामान किंमत ३००० असं एकुण १९७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सदर घटनेची होटेल मालकाने खापरखेडा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार दिपक रेवतकर,अश्विन गजभिये करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज