*सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चे सत्य*- *प्रसिद्धी मिळविण्यासाठी अश्या व्हिडिओ चा वापर तर होत नाही ना…*

*सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चे सत्य*


*पैश्याचे आमीष देऊण बोलायला लावल्याची स्वीकु्ती*

*प्रसिद्धी मिळविण्यासाठी अश्या व्हिडिओ चा वापर तर होत नाही ना…*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः प्रसिध्दी मिळवण्या करिता सोशल मीडिया चा वापर झपाट्याने वाढत आहे.व त्या करिता टिक-टाँक व इतर माध्यमातून व्हिडिओ बनवून फेसबुक, वाटसप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हायरल करुण स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेण्याचा चंग अंगीकु्त करुण रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला,बाग बगीचे, प्रेक्षणीय स्थळे,मंदिरे आदी ठिकाणाचे व्हिडिओ आपण फेसबुक वाँटसप इत्यादी सोशल मीडिया वर खुप बघतो परंतू त्यातील सत्य काय…? यावर कानाडोळा करुण त्याला लाइक व शेअर करुण अश्या समाजसुधारकाचा व संघटनांचा उदो उदो करतो*
*असाच एक व्हिडिओ सावनेर येथील एका समाजसेवीने तयार करून त्यास सोशल मीडियावर व्हायरल करुण असे कु्त्य करवून घेणार्यास चांगले हानले पाहिजे असा विचारही व्यक्त केला आहे.*
*सदर व्हिडिओत जवळपास 11 वर्षीय मुलगी व 6 वर्षीय मुलगा दाखविण्यात आला असून हे दोघेही गरीब परिवारातून असुन त्यांचे आई वडील हात मजूरी करुण आपल्या प्रपंचाचा गाडा खेचत आहे.या व्हिडीओत मुलांन कडून सदर समाजसेवीने त्यांना काही पैश्याचे आमीष देऊण बोलवून घेतले की त्यांना सदर कु्त्य करण्याकरिता प्रवु्त्त करणार्यात एखाद्या ओळखीच्या इसमाचे नाव उद्देशून घेण्यास लावले.*


*व्हारल होत असलेल्या सदर व्हिडीओ ची सत्यता जाणून घेण्याकरिता आमचे स्थानिकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊण त्यातील सत्य च्या माध्यमातून पुढे आणण्याकरिता सदर परिवार व ज्यांचे नाव सदर व्हिडिओत घेतल्या जात आहे त्यांच्याशी संपर्क केला असता सदर आई वडील चक्क रडू लागले व त्यांनी व मुलांनी सांगितले की सदर इसमाने मुलांना दहा दहा रुपयाचे आमिष देऊण सदर व्हिडिओ तयार केल्याचे निश्पन्नास आले व त्यांनी महाराष्ट्र न्यूज मीडिया शी बोलतांना सांगीतले की अश्याच प्रकारचा व्हिडिओ काही काळा आधी सदरहू समाजसेवीने तयार करुण त्यात त्याचे आई वडील असे कार्य करण्यास प्रवु्त्त करतात असे म्हटले होते*
*समाजसेवा हे खुप मोठे क्षेत्र असून समाजसेवा करत असतांना आपले नाव झाले पाहिजे असा विचार अंगीकु्त करणारे कधीही प्रकाश आमटे,आई सिंधूताई सपकाळ सारखे थोर समाजसेवी कधीही होऊ शकत नाही.थोर समाज सुधारक ज्योतीबा फुले,सावित्रीबाई फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सारखे कीतीतरी थोर समाज सुधारक होऊण गेले त्यांनी कधिही समाज सेवेतून नाव मिळवीण्याचे व त्यातून अर्थ अर्जन करुण आपली खडगी भरण्याचे कार्य केले नाहीत म्हणून ते आजही अजरा-अमर थोर समाजसेवी म्हणून पुजले जातात*
*समाजसेवक हा समाजाला योग्य दिशा देण्याच्या प्रयत्नात तो आपले सर्वस्व पणाला लावून समाजाला दिशा देतो परंतू अश्या काही संधीसाधू समाजसेवी मुळे खर्या समाजसेवींना ही समाज संदेहाच्या नजरने बघतो व त्यांच्यावर विश्वास केल्या जात नाही.*
*समाजसेवा करणे चांगली बाब आहे परंतू त्यातून नाव,प्रसिद्धी व अर्थ अर्जन करण्याचे स्वप्न बघने चुकीचे आहे.समाजसेवा करत असतांना आपल्या हातातून कुणाचेही अहीत होऊ नये,कुणाच्याही भावना दुखावू नये व आपण करत असलेल्या कार्यामुळे इतर समाजसेवींना संशयित नजरेने बघितल्या जाऊ नये याचे भान ठेऊनच योग्य समाजसेवा करणे ही काळाची गरज आहे*
*सदर व्हिडिओ वायरल करणार्यास महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने विनंती करण्यात येते की आपण सोशल मीडिया वर व्हायरल केलेला व्हिडिओ तात्काळ हटवून भविष्यात असे कु्त्य आपल्या हातातून घडनार नाही याची दक्षता घ्यावी.*
*गोर गरीब परिवारास लक्ष करुण समाजात तेड़ निर्माण करणार्या अश्या फेक व्हिडीओ ची सत्यता जनसामान्या पुढे आणण्यासाठी महाराष्ट्र न्यूज मीडिया सदैव तत्पर राहील*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …