Breaking News

रामटेक येथे रिलायन्स फाउंडेशन शाळेतर्फे पर्यावरण रॅलीचे आयोजन

रिलायन्स फाउंडेशन शाळेतर्फे पर्यावरण रॅलीचे आयोजन

रामटेक प्रतिनिधि- ललित कनोजै

रिलायन्स फाउंडेशन स्कूल, मौदा तर्फे रामटेक येथे बस स्थानक ते गांधी चौकापर्यंत पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेतर्फे परिसरातील नागरिकांमध्ये वृक्षारोपनाच्या अनुषंगाने जागरूकता निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाचे संवर्धन या उद्देशाने रॅलीचे आयोजित करण्यात आली.

वर्ग 5 वी व वर्ग 6 वी च्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांद्वारे रॅली मध्ये उद्बोधक नारे, जागृती फलके यांच्या माध्यमातून वृक्ष तोडीचे दुष्परिणाम, वृक्षांचे लाभ, वृक्ष संवर्धनाचे उपाय तसेच प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
गांधी चौक येथे विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक , पथ नाट्य सादर करून रामटेक वासीयांची मने जिंकली. या नाट्यद्वारे परिसरातील लोकांना मानसाद्वारे पर्यावरणाला पोहचविण्यात येणारी हानी आणि त्यामुळे होणारे नुकसान या संदर्भात सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी झाडांचे संरक्षण करण्याची अपील नागरिकांना करण्यात आली.
या कार्यक्रमाला रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक सुमीत कोठारी, सुरेखा माकडे, वसंत डामरे,डॉ. गिरीश सपाटे, प्रा. अनिल दाणी, ललित कनोजे तसेच अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. सागर कवारे, मंजुषा साखरकर यांनी शाळेतर्फे आयोजन केले

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …