*धरा औद्योगिक शिक्षणाची कास!*
*व्यवसाय करा, नौकरी करा हमखास!*
*शासकीय औ.प्र.संस्था सावनेर येथे प्रवेशासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा*
सावनेर- तंत्रज्ञान, आधुनिकतेच्या काळात आणि सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्ता व स्पर्धेचा युगात तुमचा पाल्य मागे पडतोय का? तर निवडा तांत्रिक शिक्षणाची वाट!
स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औ. प्र. संस्था सावनेर येते एकुण नऊ विभागातील तांत्रिक विषयावर प्रशिक्षण दिल्या जाते. येथे आय. टी., इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, आर.ए.सी., पंप मेकॅनिक, वेल्डर, मोटर मेकॅनिक,डिझेल मेकॅनिक या व्यवसायाचे शिक्षण व प्रशिक्षण दिल्या जाते.
प्रशिक्षनार्थी यांना मशिनरी,विजतंत्री,इलेक्ट्रॉनिक्स,संगणक,ऑटोमोबाईल,वेल्डिंग,पंप मेकॅनिक, रेफ्रिजरेशन व ए.सी.या क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य मिळते. त्यामुळे ते उद्योगांसाठी सक्षम आणि उपयोगी मनुष्यबळ बनतात.तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. प्रवेशाकरिता 27 जुन पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची तथा प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी मुदत आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै ला प्रसिद्ध होईल. पहिली प्रवेश फेरी 10 जुलै ते 15 जुलै पर्यंत राहील. अश्या एकुण चार प्रवेश फेऱ्याद्वारे गुणवत्तेच्या आधारावर प्रसिद्ध झाल्यावर प्रवेश निश्चित केला जातो.
नव्याने अर्ज भरणे व निश्चिती करणे यासाठी 3 जुलै ते 20 आगस्ट पर्यंत मुदत राहील.सर्व पात्र उमेदवारांना एस. एम. एस. द्वारे ही निवड कळविल्या जाईल.
तांत्रिक ज्ञान असलेला युवक स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात. मेकॅनिक वर्कशॉप, वेल्डिंग युनिट, इलेक्ट्रिशियन सेवा,संगणक कौशल्य तथा हार्डवेअर व सॉफ्टवेअर दुरुस्ती,फ्रिज व ए.सी. दुरुस्ती, ऑटोमोबाईल वर्कशॉप, पंप मेकॅनिक, टी.व्ही.तथा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्ती,तसेच मोठमोठ्या कारखान्यात व शासकीय तांत्रिक विभागात हमखास नौकरी सुद्धा मिळवु शकतात.
देशाचा औद्योगिक व आर्थिक विकास हा तांत्रिक कुशल कामगारांवर अवलंबून असतो.
तांत्रिक शिक्षणामुळे युवकांमध्ये नवीन कल्पना, प्रयोगशीलता, सृजनशिलता आणि संशोधनाची क्षमता विकसित होते.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तरुणांसाठी तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अगदी कमी शुल्कात व शासकीय विद्यावेतन योजनेच्या अंतर्गत पाचशे रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य सुद्धा मिळते तथा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना टूल किट सुद्धा दिल्या जाते.तांत्रिक शिक्षण म्हणजे भविष्य घडवण्याची एक सुवर्ण संधीचं आहे.ज्यातुन बेरोजगारी कमी होते व समाजातील जीवनमान उंचावते.
Maharashtra News Media सच की आवाज