*मनोहर कुंभारे चा नागरी सत्कार 21 जुन ला*

सावनेर ः भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त नागपुर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे व आनंद राऊत यांचा दि.21 जुन रोजी सायंकाळी 5-00 वाजता पार्मकोट लाँन सावनेर आयोजित करण्यात आला आहे.
*भारतीय जनता पक्षश्रेष्ठींनी मनोहर कुंभारे यांना नागपुर जिल्हा ग्रामीण (काटोल) व आनंद राऊत यांनी (रामटेक ) अध्यक्ष नियुक्त केल्याबद्दल राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या हस्ते,डॉ. राजीव पोतदार, वरिष्ठ भाजप नेते दादाराव मंगळे, डॉ. विजय धोटे, नागपुर जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी, प्रकाश टेकाडे, रामराव मोवाडे, अशोक धोटे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे*

*सदर आयोजनाच्या यशस्वीतेकरीता सावनेर तालुका अध्यक्ष मंदार मंगळे,नरेंद्र ठाकूर, सावनेर शहर अध्यक्ष राजु घुगल, विनोद बागडे, तुषार उमाटे, सोनु नवधींगे, शंकर भाऊ पारवे,स्वप्नील पारवे आदी परिश्रम घेत आहेत*
Maharashtra News Media सच की आवाज