मोठी बातमी
सेवकराम राऊत यांची व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहीक विंग सावनेर तालुका अध्यक्षपदी निवड
सावनेर : सेवकराम राऊत यांची व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहीक विंग च्या सावनेर तालुकाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडी बद्दल पत्रकारितेला दिशा मिळणार असून अन्यायाविद्ध लढा मजबूत होणार आहे. असा विश्वास व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहीक विंग चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोंगाडे यांनी नियुक्तीपत्र देतांना व्यक्त केला. सेवकराम राऊत हे उच्च शिक्षीत असून राज्य शास्त्रात गोल्ड मेडलीस्ट, कायदयाचे जानकार, मानस शात्र तज्ञ, नागपूर आकाशवाणी मध्ये समाचार वाचक राहीले असून एका नावाजलेल्या दैनिकाचे व ईतर दैनिके, साप्ताहीकाचे संपादक पद भुषविले आहे. सध्या ते एका साप्ताहीकेचे कार्यकारी संपादक आहेत.
त्यांनी आपल्या जिवनात अनेक लढे उभारले असून शेतकऱ्यांसाठी लढल्या गेलेल्या शेतकरी संघटनेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते आजही अन्याग्रस्त लोकांसाठी न्यायालयात लढे देत असतात. त्यांच्या या निवडी बद्दल चंद्रशेखर ढोबळे, अनिल घटे, योगेश खुरपडे, प्रमोद सोनुले, साहेबराव महल्ले, संदीप भोंगाडे, दिनेश इंगोले, बलराम चोरे, विनोद तांदुळकर, कांचन ढवंगाळे ईत्यांदींनी त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या या निवडीद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष मा. संदीप काळे, राष्ट्रीय मार्गदर्शक मा. विनोद बोरे, कार्यध्यक्ष अब्दुल कैयुम, प्रदेश सरचिटनिस मा. वामन पाठक यांचे आभार मानले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज