*तालुक्यातील शेतकऱ्यांचा यल्गार*
*सावनेर ः शेतकऱ्याच्या हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आज सावनेर तालुक्यातील सततची अतिवृष्टी आणि संपूर्ण कर्जमाफी व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले याविषयी पंचनामे करून तातडीने मोबदला द्या व इतर मागण्यांसाठी सावनेर तालुक्यातील शेकडो पुरुष व महिला यांनी उपविभागीय कार्यालय सावनेर यांना निवेदन देण्यात आले मागील वर्षी चुकीच्या कारणांनी विम्यापासून वंचित ठेवणे वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान अपूर्ण पीक पाहणी सारख्या मागण्या घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पूर्व विदर्भ अध्यक्ष सागर भाऊ दुधाने यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनं दिल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसोबत चर्चाबैठक संपन्न झाली आमच्या भागात कोणीही लक्ष देत नाही कोणीही शेतकऱ्यांची बाजू धरून उभा राहत नाही सावनेर विधानसभेतील शेतकरी वर्ग अत्यंत चिडलेला आणि प्रशासनावर नाराज यावेळी दिसून आला.

*याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चेतन गुडधे समाजसेवक भूषण कुबडे, सरपंच अशोकजी डवरे माजी सरपंच काशिराव पटे सरपंच धर्मेंद्रजी खोंडे माजी सरपंच शंकररावजी मोवाडे ,बिट्टू आचार्य, भावेश वाखोरे , धर्मेंद्र खोंडे ,काशिराव पटे, रूपरावजी मोहतकर ,संजय कोंगरे, भाऊराव दोरखंडे ,शिवशंकर मोहतकर,चंद्रशेखर मोहतकर ,राजू कडक ,छत्रपाल बेलेकर ,रामकृष्ण वाडी, गुणवंत ताजने ,गजानन ताजने ,खुशाल कडक , मोहन राहटे , खेमराज धुंड, नेमराज हाकंदे, पुरषोत्तम हाकंदे ,किसन हाकंदे, तेजराम ठेंगे ,सुभाष चोरघडे, मोरेश्वर चोरघडे, निखिल बेरड, शिव धूर्वे, नचिकेत मंगळे ,कुनाल मंगळे आदीसह परिसरातील शेकडो शेतकरीउपस्तिथ होते*
Maharashtra News Media सच की आवाज