*शिक्षण महर्षी स्वर्गीय दामोदधररावजी डाहाके साहेब यांचा 108 वा जयंती सोहळा उत्सव मोठ्या थाटात पार पडला*
सावनेर ः विद्या प्रसारक मंडळ सावनेरचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी स्व. दामोधररावजी डाहाके साहेब यांची 108 वी जयंती संस्थेद्वारा संचालित जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर तसेच जवाहर विद्यालय वाकोडी यांचे संयुक्त विद्यमाने जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर च्या प्रांगणात दिनांक 9 नोव्हेंबर 2025 ला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयरावजी डाहाके, सचिव नरेंद्रराव डाहाके,उपाध्यक्ष.मदनराव डाहाके साहेब पुरुषोत्तम मुंडे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सावनेर, वसंतराव जीवतोडे गुरुजी,संस्थेचे सभासद शेषराव घुगल गुरुजी .विनाताई बोबडे ,मा.ममताताई डाहाके, यशपाल डाहाके,डॉ.राहुल डाहाके, स्वप्निल डाहाके ,मा.सौ.सोनालीताई डाहाके .डॉ. सौ.ऐश्वर्या ताई डाहाके जवाहर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सरोज अटाळकर,तालुका मुख्याध्यापक संघ सावनेर चे अध्यक्ष.किशोर चौधरी, जिल्हा मुख्याध्यापक महासंघ अध्यक्ष गजानन कुरवाडे,जवाहर नेहरू विद्यालय चे माजी मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव, ताजुद्दीन बाबा संस्थान वाकी चे विश्वस्त प्रभाकरराव डाहाके आणि ज्ञानेश्वरराव डाहाके, जवाहर विद्यालय वाकोडी शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी पदाधिकारी मिनाथ चौधरी,सुभाष खोरगडे गोपाल डांगे , जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर आणि जवाहर विद्यालय वाकोडी येथील आजी-माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

साहेबांच्या जयंती सोहळा निमित्त उपस्थित सर्व मान्यवरांनी साहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले आणि या शुभ पर्वावर संस्थेचे उपाध्यक्ष व जवाहर विद्यालय वाकोडीचे मुख्याध्यापक तसेच आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक मदन डाहाके यांनी गुरुपूजा आणि सत्संग च्या माध्यमातून साहेबांना आदरांजली वाहिली. सावनेर नगरीत प्रभात फेरी काढून शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यासारख्या स्पर्धेचे आयोजन करून साहेबांचे शैक्षणिक व सामाजिक योगदानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची प्रदर्शनी भरवून उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या तसेच निबंध लेखन आणि वकृत्व स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून जवळपास 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पुरुषोत्तम मुंडे साहेब यांनी याप्रसंगी उद्गार काढले की साहेबांनी लावलेल्या वटवृक्षाला बहरविण्यासाठी संस्थेचे वर्तमान पदाधिकारी यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या अंगी असलेली शालीनता आणि संयमता यामुळेच जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जवाहर विद्यालय वाकोडी या शाळा डौलाने उभ्या आहेत. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तसेच जवाहर विद्यालय वाकोडी चे मुख्याध्यापक मदन डहाके साहेब यांनी संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शाळांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले.
जवाहर विद्यालय वाकोडी चे शिक्षक योगेश लोहकरे यांनी याप्रसंगी साहेबांनी त्यांचे नातू म्हणजेच संस्थेचे उपाध्यक्ष व जवाहर विद्यालय वाकोडी चे मुख्याध्यापक मदान डाहाके याना लिहलेल्या काल्पनिक पत्रात संस्थेची आणि शाळांची जबाबदारी संदर्भात स्वरचित रचना वाचून सर्वाना भारावून स्तब्ध केले आणि स्वतःसोबत इतरांचे डोळे सुध्दा पाणावले. शिक्षिका श्रीमती मनोरमा वाकडे यांनी साहेबांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. शिक्षक मिलिंद देशमुख यांनी साहेबांच्या जीवनावर दिग्दर्शित केलेले नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले शेवटी साहेब आणि त्यांचा पणतू दानिश मदानराव डाहाके यांचा संयुक्तिक वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संचालन सौ.सुनंदा रडके, प्रास्ताविक मिलिंद देशमुख यांनी केले तर आभार श्रीकांत चकोले यांनी मानले.
Maharashtra News Media सच की आवाज