*खाप्यात कांग्रेसला मोठा धक्का*
*निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस ला रामराम ठोकत अनेक कार्यकर्ते भाजपात शामील*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
*सावनेरः राज्यात सर्वत्र सार्वत्रिक निवडणुकांची सुरुवात झाली असुन त्याचा पहिल्या टप्प्यातील 2 डिसेंबर रोजी होऊ नगरपालिका निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत अश्यात तालुक्यातील खापा नगर नगरपालिका येथील अनेक सुनील केदार खंदे समर्थक व त्यांचे अनेक सहकारी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपा मधे शामील झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर परत पुर्व आमदार सुनील केदार यांनी जोरका झटका लागला आहे*

*माजी आमदार सुनील केदार यांचे काही खंदे समर्थक व शेकडो कार्यकर्ते यांच्या सहीत पुर्व प्रदेश अध्यक्ष व राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र पिंपळे, अमित राय, विक्की पाटील, संदीप नारनवरे, सचिन राय, चंद्रकांत शेंडे, रणजीत बागडे, अतुल ढोरे, बॉबी गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

*काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात शामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र घालून सर्वांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
Maharashtra News Media सच की आवाज