Breaking News

*प्रभागच नव्हे तर संपूर्ण नगरीचा सर्वांगीण विकास आमचे लक्ष*

*प्रभागच नव्हे तर संपूर्ण नगरीचा सर्वांगीण विकास आमचे लक्ष*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर ः सावनेर नगरपालिकेच्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेली निवडणूकीचे वातावरण आता तापू लागले असुन सर्व राष्ट्रीय पक्ष स्थानीक आघाड्यांनी आपआपल्या प्रचारात वेग आणत वार्डातील गल्ल्याबोळीत घाम गाळत मतदारांशी संपर्क साधत आहेत.


*अश्यातच वार्ड प्रभागच नव्हे तर संपूर्ण सावनेर शहरातील सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस, शिवसेना आघाडीचे प्रभाग 1 चे उम्मेदवार लक्ष्मीकांत जोशी, व माजी नगरसेविका ममता नारनवरे यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधिंशी बोलतांना सांगितले की आमच्यावर पुर्व मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, शिवसेना प्रमुख उद्दव ठाकरे, शिवसेना नागपुर जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सीमा चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहो. आमच्या प्रभागातील अनेक समस्या आमच्या नजरेत आहे प्रभाग क्र 1 मधे रस्ते, नाल्या, सार्वजनिक शौचालय, पीण्याचे पाणी, पथदिवे सारख्या सामान्य समजल्या जाणाऱ्या समस्यां सोबतच परिसरातील ओपन स्पेस मघे परिसरातील आबालवृद्धांकरिता बालोद्यान, ग्रीन जीम, छोटे का होईना रनिंग ट्रँक सोबतच दलित वस्त्यांमध्ये समाजभवन, अत्याधुनिक वाचनालय, योग भवन आदिंची निर्मीती व शहरातील नागरिकांनकरिता रखडलेल्या जलयोजना, मलनिस्सारण योजना व सर्वात महत्वाचे म्हणचे सावनेर शहराला ओळख देणारी जिवनदायनी कोलार नदी जी मागील समाछसेविंच्या दुर्लक्षामुळे नाल्यात रुपांतर होऊ पाहात आहे तीला एक आदर्श नदी म्हणून विकसित करणे हे आमचे लक्ष आहे.सोबतच प्रभाग व कोलार नदिच्या तिरावर तसेच शहरातील लेआऊट मधिल ओपन स्पेसच्या जागेवर सोलर प्लांट उभारणी करुन गोरगरिबांना येत असलेल्या अवाढव्य विजदेयकातून मुक्त करण्यासाठी टोकाचे निर्णय घेण्यावर भर.


*आपल्या शहर व प्रभागाला विकासशील बनविण्यासाठी आम्ही व आमचे पक्ष सदैव तत्पर राहुन शहरातील बेरोजगार यूवक युवतींना रोजगार उपलब्ध करुण देण्यासाठी रोजगाराभिमुख योजना राबविण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …