Breaking News

*सावनेरात जड़ वाहने बायपास नी काढा* *अँड्.अरविंद लोधी यांच्या नेतृत्वात जेष्ठ नागरिकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

*जड़ वाहने बायपास नी काढा*

*अँड्.अरविंद लोधी यांच्या नेतृत्वात जेष्ठ नागरिकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

सावनेर प्रतिनिधि -सुरज सेलकर सावनेर

*सावनेरः सावनेर शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्र.47 ला जुडलेला असल्यामुळे तसेच नागपूर,अमरावती, जबलपुर,छिंदवाडा,भोपाळ या मार्गाने शहरातुन जड़ वाहनांची सततची वर्दड़ असल्यामुळे शहरालागत केन्द्रिय महामार्ग निर्माण विभागाव्दारे शहराच्या बाहेरून चार पदरी महामार्ग निर्माण करण्यात आले आसून सुध्दा जबलपुर,अमरावती, नागपुर,हिंगणा,गोंडखैरी,कळमेश्वर औद्योगिक वसाहत तसेच नागपूर छिंदवाडा,भोपाळ या मार्गावर धावनारे जड़ वाहने, शहराच्या आतून व वर्दळीच्या ठिकाणावरुण आवागमन करत असल्याने सातत्याने अपघाताची भीती नगर वासीयात असून शहरात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे*
*सावनेर शहरातून होणारी जड़ वाहनाची वाहतुक बायपासने वळवीने अत्यंत आवश्यक आहे.सावनेर शहरातील शिवाजी चौक,गांधी चौक,बस स्थानक,गडकरी चौक इत्यादी अती वर्दळीच्या ठिकाणी तसेच सदर मुख्य मार्गावर शाळा महाविद्यालय असल्याने लहान मोठे अपघात नेहमीची बाब झाली आहे.सदर विषयावर शहरातील वरिष्ठ नागरिकांनी नगर पालिकेचे उपाध्यक्ष अँड्.अरविंद लोधी यांच्या नेतृत्वात सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांना निवेदन सादर करुण शहरातून होत असलेली जड़ वाहनांची प्रवेश बंद करुण सदर वाहतूक बायपास मार्गाने वळविन्याची विनंती सदर निवेदनातुन करण्यात आली आहे.*
*जेष्ठ नागरिकांचे निवेदन स्विकारुन तात्काळ उपाययोजना आखून शहरातून होत असलेली जड़ वाहनांच्या वाहतूकीवर तोडगा काढण्याकरीता निश्चित प्रयत्न केल्या जाणार असल्याची स्विकु्ती पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी उपस्थित शिष्ट मंडळास दीली*
*याप्रसंगी ईश्वर राऊत,प्रभाकर काळे,किसन भेलकर,शंकर राऊत,खेमराज ताजने,शंकर ठाकरे,संतोष नगराळे,गोपाल भालेराव,डोमाजी गमे,अतुल महंत,गुलाब चंदविनी,भगवंता काळबांडे सह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …