Breaking News

गडचांदूरात नागरिकता कायद्याविरोधात मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा

गडचांदूरात नागरिकता कायद्याविरोधात मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा

आवारपूर प्रतिनिधि – गौतम धोटे

केंद्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गडचांदूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.शहराच्या मुख्य मार्गाने भ्रमण करीत गांधी चौक येथे रॅलीचे रुपांतर सभेत झाले.अध्यक्षस्थानी सैय्यद आबीद अली होते तर गडचांदूर येथील राजा मशीदीचे इमाम हसनैन रज़ा,नांदा,बिबी,कोरपना येथील इमामांसह, प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी, अरूण निमजे,धनंजय छाजेड,सागर ठाकूरवार,ईश्वर पडवेकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वांनी NRC,CAA चा तिर्व शब्दात निषेध करत हा कायदा वापस घेण्याची एकमुखी मागणी केली. संविधान का अपमान नही सहेंगे.नही चलेंगी,नही चलेंगी संविधान से छेड़छाड़ नही चलेंगी.ज़िंदाबाद,जिंदाबाद भारतीय संविधान ज़िंदाबाद.देशका कर्ज चुकाना है,संविधान बचाना है.अशा गगनभेदी घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या.यावेळी सर्व धर्मिय समाज बांधवांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती. ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …