नाशिकच्या चिमुकल्या भाऊ बहिणीने सर केले कळसुबाई शिखर
विशेष प्रतिनिधी:- दिलीप येवले
नाशिक- राघेय कोमलनाथ सोनार वय तीन वर्ष आठ महिने व अनघा कोमलनाथ सोनार वय पाच वर्ष तीन महिने या चिमुकल्या भावंडांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (1640 मीटर) दिनांक 15 12 2019 रोजी सर केला.
राघेय व अनघा हे आपल्या आईवडिलांबरोबर कळसुबाई शिखर येथे गेले असता दोघांनीही डोंगर चढण्यांची तयारी दर्शविली होती आणि आई वडिलांबरोबर गप्पा मारत शिखर सर देखील केले व राघेव व अनघा हि कोमलनाथ सोनार (उपमंडल अभियंता, चांदवड) व स्वरांजली सोनार, (डीवाय, सीएएफओ, जिल्हा परिषद, नाशिक) यांची मुले आहे महाराष्ट्रातील सर्व महिला अधिकाऱ्यांनी मिशन कळसुबाई या ट्रेकचे आयोजन केले होते व रफिक शेख माऊंट एव्हरेस्ट सर करणारे एवरेस्ट यांनी ड्रीम अँव्हेन्चर या ग्रुपने त्यांना सहकार्य केले. यावेळी आईला सोडायला गेलेली राघेव व अनघा देखील बारो येथे बेस कॅम्पला आलेले होते सर्वांचा उत्साह व प्रोत्साहन यामुळे त्यांना देखील कळसुबाई शिखर चढावसे वाटले आणि त्यांनी शिखर सर देखील केले राघेव हा आनंद निकेतन शाळेचा विद्यार्थी आहे व अनघा ही लिटिल मिलेनिअम शाळेची विघार्थिनी असुन ती केजी ३ ला शिक्षण घेत आहे.