*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा मातोश्री वृध्दाश्रमात वृध्दांना कापडांचे वाटप व दर्शन सहल*

*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा मातोश्री वृध्दाश्रमात (आदासा) वृध्दांना कापडांचे वाटप व दर्शन सहल*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*

सावनेरः सामाजीक बांधीलकीची जाण ठेवुन जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा वर्षभर सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्याच अनुषंगाने 2019 या वर्षाच्या शेवटी ख्रिसमस या शुभ दिनाचे औचित्य साधून दिनांक 25 डिंसेबर 2019 ला मातोश्री वृध्दाश्रम आदासा येथील वृध्दांना नविन 40 साडी, 40 ब्लाऊज पीस,7 पातळ, 40 फुल शर्ट पीस व जुनी शीवलेली कापडे वाटप करण्यात आली.तसेच मिठाई वाटण्यात आली. वृध्दाश्रमात उत्तम सोय असुन वृध्दांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते, अशा भावना वृध्दांनी व्यक्त केल्यात. वृध्दांच्या चेहर्यावर समाधानाचे व कृतज्ञतेचे भाव दिसत होते. वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक श्री प्रदीप चंदनबटवे यांनी वृध्दाश्रमाची माहीती दिली. याप्रसंगी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल चे अध्यक्ष श्री वामनराव खंडाळ, उपाध्यक्ष श्री घनश्यामजी पुंड ,सचिव श्री गजाननराव भोयर ,सहसचिव श्री अशोकराव काकडे ,सल्लागार श्री विनायकराव राऊत, सर्वश्री रूपराव राऊत, काळबांडे, धुर्वे, दुधाने,कळसकर भाजीखाये, विठ्ठलराव काकडे,श्रीमती निर्मलाताई कोंडे, सौ.छायाताई गोरडे त्याशिवाय फेस्काम पुर्व विदर्भ विभाग नागपुर चे सहसचिव श्री वंसतराव कळंबे, श्री वंजारी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
सर्वांनी वृध्दाश्रमात सहभोजन केले, आदासा येथील श्री गणेश, धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी, कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेऊन कामठी येथील ड्रगन पॅलेस पाहीले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन असल्याने प्रवास व्यवस्थीत झाल्याच्या भावना सहप्रवाश्यांनी व्यक्त केल्यात.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …