*सावनेर येथे नागरिकता कायद्या विरोधात विराट आक्रोश मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा*

*सावनेर येथे नागरिकता कायद्या विरोधात विराट आक्रोश मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा*

*तहसीलदार यांचे मार्फत मा.राष्ट्रपती यांना निवेदन*

मुख्य संपादक किशोर ढुंढेल

*सावनेरः नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत.नागरिकत्व कायद्याचं समर्थनही केलं जात आहे .आणी हा कायदा मागे घेण्यासाठी सावनेर शहरा सह तालुक्यातील मुस्लिम बांधवानी नागरिकत्व सुधारीत कायद्याविरोधात .आज दि.27/12/2019 रोजी सावनेर तहसील कार्यालय येथे शांतीपुर्वक पोहचून मुस्लिम बांधवानी N.R.C -CAA या विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार दिपक कारंडे यांचे मार्फत मा.राष्ट्रपती यांचे नावाने निवेदन सादर केले*
*सदर मोर्च्यापुर्वी शहरातील मश्जीद येथे सर्व मुस्लिम बांधवांनी दुपारची नमाज अता करुण मडकी चौक,बाजर चौक,गडकरी चौक,गांधी पुतळा असे भ्रमण करित तहसील कार्यालयापर्यत पायदळ हातात तीरंगा व्धज व नागरिकत्व सुधार कायदा रध्द करा असे फलक हातात घेऊण सदर विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करत पोहचून निवेदन सादर केले*
*सदर मोर्चा गांधी चौकात पोहचताच मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल यांनी सभेची अध्यक्षता करुण वरिष्ठ समाजसेवी डोमासाव सावजी,रामभाऊ उमाटे,दिनेश इंगोले,मार्क साखरपेकर,भगवान चांदेकर,श्री महाले आदींनी सभेला संबोधित करत केन्द्र शासनाव्दारे सदर कायदा हा लादन्याचा कट रचल्याचा आरोप करत या विधेयकाच्या विरोधात निषेध नोंदवीला*

*मोर्च्याचे यशस्वीते करिता हाजी रफीक शेख,सादिक शेख,नगर सेवक शपीक सैय्यद,युवक काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे,नगर सेवक अविनाश झाडे,अँड यूवराज बागडे,साबीर शेख,अकरम शेख,इमरान शाह,नाझीम शेख,माजी नगर सेवक दिलावर शेख,शमीम कुरैशी,छोटु हाजी,हाजी नबी भाई,महबुब शाह,रफीक शाह,सलिम भाई,निशाद पटेल,नसीर शेख,मुन्ना भाई,माजी नगर उपाध्यक्ष गोपाल घटे,गोलु शाह,वैभव कोकडे,मौलाना आफताब,मौलाना माजीद साहेब,गुलाम शाह,ऋषीकेश नाईक,दर्शन नाईक,आसीफ शाह,महमुद शाह,इरशाद शाह,जितेन्द्र खेकारे सह मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते*
*मोर्च्या दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये करिता पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.सागर कारंडे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त तर स्थानिक आठवडी बाजार असल्याने वाहतूक व्यवस्था विस्खळीत होऊ नये याकरिता वाहतूक अधिकारी अशोक आठवले,पो.का.काकडे,कारेमोरे आदींनी चोख व्यवस्था ठेवणयात आली सदर आयोजनाचे संचालन नगर सेवक शपीक सैय्यद यांनी तर आभार ना.जी.अल्प संख्यक सेल चे उपाध्यक्ष साजीद शेख यांनी मानले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …