*ब्रेकींग न्यूज* – *सावनेर कळमेश्‍वर तालुक्याला गारपिटीने झोडपले*

*ब्रेकींग न्यूज*

*सावनेर कळमेश्‍वर तालुक्याला गारपिटीने झोडपले*

*संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल*

*कपाशी,हरभरा,गहु,पालेभाज्या सह संत्रा मोसंबी पीकाचे अतोनात नुकसान*

 

*रात्रीच्या काळोखात आस्मानी सुल्ताननने केला घात*

कळमेश्वर प्रतिनिधि- मुशीर सैय्यद

*सावनेरः बुधवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटिने सावनेर तालुक्यातील खापरखेडा,पाटनसावंगी,बडेगाव,केळवद,खापा परिसरातील तर कळमेश्वर तालुक्यातील मोहपा धापेवाडा परिसरातील गावांना अक्षरशः गारपीटीने झोडपून काढले असून या भागात संत्रा मोसंबी उत्पादका सह कपाशी,तुर,गहु,हरभरा, पालेभाज्या उत्पादन करणार्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे*
*मध्यरात्री दोन च्या सुमारास अचानक पणे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली लगेच पाणी सुरू असताना गारपीटीलाही सुरुवात झाली व ही गारपीट कुठे चार ते पाच मिनिटे तर कुठे अर्धा तासाहुन अधिक झाल्याची शेतकऱ्यांनी माहिती दिली या गारपिट इत संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा मृग बहार राचा संत्रा पूर्णपणे खाली पडला असून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच कापूस, तूर,चना, वांगी व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. मोहपा परिसरात मोहपा सह बुधला,म्हसेपठार,रामगिरी,खुमारी,मांडवी, देवबर्डी, तेलंगाव,कण्याढोल,पीपळा,सवंद्री,या तर धापेवाडा परिसरात धापेवाडा सह बोरगाव (धूरखेडा), भडांगी,आदासा,खानगाव,सोनपूर,सिल्लोरी,ब्रह्मपुरी तोंडाखैरी गावांना गारपिटीचा प्रचंड प्रमाणात फटका बसला.*
*एकीकडे आधिच अतीवु्ष्टी,ओला दुष्काळ,नापीकी तुन कसेबसे स्वताला सावरत शेतकरी वर्ग आपल्या शेतीत मशागत करुण काळ्या आईच्या कुशीतुन आपल्या कष्टाने घाम गाळत आपली शेती पीकवीन्या करीता जीवाचे रान करतो व अश्यातच अचानक अवकाळी पाऊस त्यालाही तोड देत उदास नजरेने आपल्या पीकांचे संरक्षण करण्यास सतत आटापीटा करत राहतो इतके सर्व करत असतांना त्याच्या मनात फक्त एकच ध्यास असतो तो म्हणजे मी लावलेले पीक माझ्या हातात काही का प्रमाणात होई ना पदरी पडले पाहीजे आणी अश्यात निसर्गाचा प्रचंड प्रकोप त्याच्या पदरी पडतो व पदरात येत असलेले पीक अश्या अवकाळी पाऊस व त्यातून होणार्या गिरपीटीने मातीत मीसळून जाते आणी हवालदील झालेल्या शेतकर्या जवळ आपल्या नशीबाला दोष देण्या खेरीज काहीच उरत नाही*
*याच हंगामात ओला दुष्काळ संकटात सापडलेल्या शेतकर्यांना अद्यापही शासनातर्फे अनुदान मीळाले नाही व ते केव्हा मीळणार अश्यात परत आसमानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांचे अश्रू पुसन्याकरीता,त्यांना झालेले अनोनात नुकसान भरपाई करण्याकरिता,राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी शासनाने शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्या करीता मदतीचा हाथ त्यांच्या पाठीवर ठेवने गरजेचे झाले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …