Breaking News

*काटोल तालुक्याला गारपीटी सह अवकाळी पावसाचा तडाखा*-*कँबीनेट मंत्री अनील देशमुख शेतकऱ्यांच्या बांध्यावर*

*काटोल तालुक्याला गारपीटी सह अवकाळी पावसाचा तडाखा*

*कँबीनेट मंत्री अनील देशमुख शेतकऱ्यांच्या बांध्यावर*

*ओल्या दुष्काळाची नुकसान भरपाईची प्रतिक्षा त्यात गारपीट व अवकाळी पावसाने पीक गारद*

*विशेष प्रतिनिधी काटोल:-*

*काटोल नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापुस तुर यासह रब्बी हंगामातील गहु हरभरा तसेच संत्रा व मोसंबी या फळपिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आज काटोल तालुक्यात पहावयास मिळाले*

*दि. २ जानेवारीच्या सकाळी दोन वाजता गारपीट झाल्याने  शेतकऱ्यांची हाती येणाऱ्या पिकांची उरलीसुरली आशा मावळली आहे दि 31डिसेंबर पासून पावसाने हजेरी लावली असुन थोड्या फार अवधीच्या अंतराने सातत्याने पाऊस पडत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.*
*अवकाळी झालेल्या गारपीटीची माहिती मिळताच कँबीनेट मंत्री अनिल देशमुख व शेकापचे नेते राहुल देशमुख, अनुप खराडे, समिर उमप तसेच नगर परिषद काटोलचे विरोधी पक्ष गटनेते संदिप वंजारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार बाजु सारुन तातडीने तालुक्यातील डोंगरगाव, गोंन्ही, वाढोणा, कारला, येरला, येनवा, मोहखेडी, कलंभा, इसापूर, झिलपा, बोरी, मेंडकी, लाडगाव, परसोडी चिखली, खैरी, सोनोली, तपनी, गोल्हरखापा आदी गावांत पोहचून गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन पाहणी केली.तसेच तालुक्यातील सर्व गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले.*

*जिल्हा परिषद व पंचायत समिती आचार संहिता सुरू असल्याने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांनी मंत्र्यांचा ताफा पुढे गेल्यानंतर नुकसानाची पाहणी करून अहवाल वरीष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …