*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा दिव्यांग विद्यार्थ्यांना कापडांचे वाटप*
*विशेष प्रतिनिधी काटोल*
काटोलः सामाजिक बांधिलकी व ” अपंग सेवा हीच ईश्र्वर सेवा ” ही कास बाळगून, स्वामी विवेकानंद जयंती, माॅ जीजाऊ जंयती च्या शुभ दिनी दि. 12-1-2020 ला जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा मुर्ती रोड काटोल येथील मूकबधिर विद्यालयात दिव्यांगाना नविन कापड वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री साई शिक्षण संस्था नागपुर द्वारा संचालीत राजीव गांधी निवासी अस्थिव्यंग, अंपग, व मूकबधिर या काटोल येथील तिनही विद्यालयातील निवासी दिव्यांग विद्यार्थ्यांना नविन शर्ट पीस 71, पॅन्ट पीस 6, ब्लाऊज पीस 50 व लेडीज पायजमा 10 नग कापडांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांची उत्तम सोय असुन विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंदाचे व समाधानाचे भाव दिसत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल चे अध्यक्ष श्री वामनराव खंडाळ, प्रमुख अतिथी श्री विनायकराव राऊत, सचिव श्री गजाननराव भोयर, सहसचिव श्री अशोकराव काकडे होते.याशिवाय प्रामुख्याने श्री रूपराव राऊत, दुधाने, मनोहर टेंभेकर, शेषराव पराते,भाऊराव भोयर, श्रीमती निर्मलाताई कोंडे, छायाताई गोरडे, शिक्षण संस्थेचे पालक संचालक श्री अरविंद राऊत, सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री विजय हींगणेकर यांनी केले तर श्री उत्तम सावरकर यांनी प्रास्ताविकातुन विद्यालयाची माहीती विषद केली. मुख्याध्यापक श्री शेषराव नेहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.