*विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे व्यवसाय मार्गदर्शन परिषद*
धर्मापूरी: विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापूरी येथे विविध व्यवसायाची संधी, कल चाचणी, अभिक्षमता चाचणी व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी या उद्देशाने दि. १०.०१.२०२० रोजी व्यवसाय मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विनोदजी गभने, जिल्हा समुपदेशक व्हीजीपीजी विभाग, डाएट नागपूर, कार्यक्रमाचे अध्यक्षा मा. मीनाताई पुरुषोत्तम खोडे, संस्था अध्यक्षा, प्रमुख अतिथी मा. पुरुषोत्तम मा. खोडे, संस्था सचिव, वक्ते मा. श्री. ज्ञानेश्वर गलांडे, नागपूर विभागीय समन्वयक तसेच मा. श्री. एच. एम. खोडे प्राचार्य, मा. श्री. चटोले सर पर्यवेक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मा. गभने साहेबांनी व्यवसायातील विविध संधीबाबत मार्गदर्शन केले. मा. गलांडे साहेबांनी कल चाचणी व अभिक्षमता चाचणी यावरून आपले ध्येय कसे निश्चित करावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये वर्ग १० वी चे १५० विद्यार्थी व वर्ग १२ वी चे २०० विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आंभोरे सर, संचालन श्री. मारबते सर, व आभार प्रदर्शन श्री. कुरसुंगे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. सातकर सर, श्री. घुबडे सर, सौ. सार्वे मॅडम, कु. मलेवार मॅडम, श्री. मसराम सर, श्री. शहारे सर व सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.