*तायवाडे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी–*स्थानिय तायवाडे ग्रुपस् ऑफ इस्टीट्यूशन महादूला-कोराडीच्या प्रागंणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे होत्या. सच्चिदांनद शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.शौनक तायवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.अंकीता तायवाडे या होत्या.कार्यक्रमाची सुरवात झेंडा वदंनाने करून राष्ट्रगीत व त्यानतंर सविंधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन डॉ.वकील शेख(राज्यशास्त्र विभागप्रमुख)यांच्या सोबत सर्वांनी करुन करण्यात आले.यानतंर तायवाडे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी देशभक्ति गिताचे गायन करून सांस्कुतिक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.याकार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*