*मातोश्री वु्ध्दाश्रम आदासा (सोनपुर) येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण* *सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार*

*मातोश्री वु्ध्दाश्रम आदासा (सोनपुर) येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण*

 

*सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार*

*वुध्दांनी घेतला देश भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आस्वाद*

सावनेर – *जन सेवेत अग्रगण्य अश्या भारतीय आदिम जाती सेवक संघ विदर्भ नागपूर व्दारे संचालीत “मातोश्री वुध्दाश्रम आदासा”येथे संस्थेचे अध्यक्ष राजेश कुमार मालवीय यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी मोहीते,सचिव प्रमोद खराडे,सह सचिव दिपाली खोब्रागडे,कोषाध्यक्ष विजय शेंन्डे,वुध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे ,मातोश्री वुध्दाश्रमातील सर्व वुध्द व सत्कारमुर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करुण राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली*

*सामाजिक क्षेत्रात जिवन वेचणार्या मान्यवरांचा सत्कार*

*ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर संस्थेच्या पदाधिकारींनी सामाजिक क्षेत्रात आपले जीवन अर्पण करणारे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अजीत सिन्हा,योग व पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार व महाराष्ट्र न्यूज मीडिया चे संपादक किशोर ढुंढेले, सामाजिक कार्यकर्ता सौ.शालीनी सिन्हा,पत्रकारीता क्षेत्रातील उदयमान पत्रकार व न्यूज प्रभात,विदर्भ न्यूज व युगधर्म चे प्रतिनिधी पीयूष झिंजूवाडीया यांचे मान्यवरांचे हस्ते शाँल व श्रीफळ देऊण सन्मानित करण्यात आले.*

*याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश कुमार मालवीय सह उपस्थीत मान्यवरांनी संस्थेच्या समाज कार्यावर प्रकाश टाकून सत्कारमुर्ती यांच्या समाज कार्याची प्रशंसा करत आजच्या काळात अश्या संस्था व समाजसेवकांची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगीतले*

*सत्कार समारंभा नंतर म्युझिक अँन्ड मी इव्हेन्ट अँड अँकेडमी व्दारे देश भक्ती गीतांची महफीलीचे आयोजन करण्यात आले होते त्यात “ऐ मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी…सार्या देश भक्ती गीतांनी उपस्थितीतांना भारावून टाकले याप्रसंगी महाराष्ट्र न्यूज मीडिया चे सुरज सेलकर,दखल न्यूज चे रवी काळबांडे प्रामुख्याने उपस्थित होते*


*नागपूर जिल्ह्यात वुध्दांच्या सेवे करीता अग्रस्थानी असलेली ही संस्था बिना अनुदानीत असुन सुध्दा वु्ध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या निराश्रित वु्ध्दांची जातीने काळजी घेतात हेच भारतीय आदिम जाती सेवक संघा व्दारे संचालीत “मातोश्री वुद्धाश्रमाचे वैशिष्ट्य आहे..*


*कार्यक्रमाचे संचालन सौ.किरण निनावे नी तर प्रास्ताविक मातोश्री वु्ध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रदिप चंदनबटवे यांनी तर आभार शिल्पा मीरासे यांनी मानले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …