*दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या मागणीकरीता चलो काटोल नगर परिषद -* *# 3 फेब्रुवारीला दिव्यांग बांधव घेणार नगर पालिकेचा ताबा

*चलो काटोल नगर परिषद – चलो काटोल नगर परिषद*


*दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या मागणीकरीता चलो काटोल नगर परिषद -*

*# 3 फेब्रुवारीला दिव्यांग बांधव घेणार नगर पालिकेचा ताबा.*

*विशेष प्रतिनिधी काटोल*
काटोलदिव्यांग बांधवांना वाटप करावयाचा 2018-19 यावर्षीचा 5% निधी व मागिल 2010 पासूनचा अनुशेष निधी काटोल पालिका प्रशासनाने अजूनही वाटप न केल्याने याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांसह प्रहार संघटना येत्या दि. 3 फेब्रुवारी रोज सोमवारला नगर परिषदेत धडकणार असून नगर परिषदेचा ताबा घेणार आहे व जोपर्यंत दिव्यांग बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पालिकेतून हटणार नसून दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या मागणीकरीता सर्व दिव्यांग बांधव, पालकवर्ग व सर्व काटोलकर जनतेने 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता नगर पालिकेसमोरील कामगार मैदान येथे जमा व्हावे, दिव्यांग बांधवांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यास मदत करावी, ही विनंती.*

*प्रहार सेवक दिनेश निंबाळकर,आशिष जयस्वाल, अजय पांडे आदीं सदर आयोजनाचे नेतृत्व करणार असुन जास्तीत जास्त दिव्यांग बंधु भगीनींनी सदर आयोजनात शामील व्हावे असे आव्हान केले आहे*
*मो अधिक माहीती करीता 9822701978/9822362344/9922177631वर संपर्क करावे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …