Breaking News

आमदार धोटे यांची निवडणूक रद्द करा.-माजी आमदार अँड.चटप यांची याचिकेत विनंती/१३ मार्चपर्यंत उत्तर द्या,कोर्टाचे आदेश.

आमदार धोटे यांची निवडणूक रद्द करा.
माजी आमदार अँड.चटप यांची याचिकेत विनंती/१३ मार्चपर्यंत उत्तर द्या,कोर्टाचे आदेश.

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे
राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे नवनियुक्त आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार,शेतकरी संघटना व विदर्भवादी नेते अँड.वामनराव चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनी अवैध कृती करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप याचिकेत अँड.चटप यांनी केला आहे.न्या.विनय जोशी यांनी शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोग,आमदार धोटेसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून येत्या १३ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती असून आमदार धोटे यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अॅट्रासीटीसह अन्य काही प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची माहिती नमुद केली नाही.कायद्यानुसार उमेदवारांनी स्वतःविरुद्धच्या सर्व गुन्ह्यांची माहिती देणे आवश्‍यक असते परंतु आमदार सुभाष धोटे यांनी जानिवपुर्वक या तरतुदीचे उल्लंघन केल्याची माहिती असून आता आमदार सुभाष धोटे व इतरांच्या उत्तरेकडे लक्ष लागले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …