*डॉ.शरयू तायवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*डॉ.शरयू तायवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*


*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी-  येथील तायवाडे महाविद्‍यालयाच्‍या प्राचार्य डॉ.शरयू बबनराव तायवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात महाविद्‍यालयात संपन्‍न झाला.डॉ.शरयू तायवाडे यांची कार्यशैली ही अत्यंत प्रेमळ ,सौहार्दपूर्ण असल्‍यामुळे त्यांच्यावर प्रेम करणा-या विद्यार्थ्यानी व समस्त प्राध्‍यापक-कर्मचारी वर्गातर्फे वाढदिवसाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.विद्यार्थ्यानी केक कापून वाढदिवसाचे गीत गायन करून अतिशय आंनदात वाढदिवस साजरा केला.डॉ.शरयू तायवाडे या ओबीसी महिला महासंघातही कार्यरत आहेत. शिक्षण, समाजकारण,सहकार व साहित्य या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणा-या .डॉ.शरयू तायवाडे यांचा लोकसंपर्क फार वाढलेला असल्‍यामुळे त्‍यांच्‍या कार्यावर,प्रेमळ विनम्र वागणुकीवर खूष होवून अनेकांनी त्यांना मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कार्याचा आवाका मोठा असला तरी महाविद्‍यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्या सातत्याने नवनव्या उपक्रमांना-कार्यक्रमांना सादर करण्यासाठी धडपडत असतात.विद्‍यार्थ्‍यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नवनवीन उपक्रम सादर करण्याच्या प्रेरणा च्या सतत विद्यार्थ्यांना देत राहतात.त्यांच्या या कार्यशैलीमुळे त्या विद्यार्थीप्रिय झालेल्‍या आहेत.त्या प्रेमापोटीच विद्‍यार्थी,प्राध्‍यापक व कर्मचारीवर्ग यांनी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमसाठी समन्वयक म्‍हणून डॉ.वकील शेख,डॉ.कोमल ठाकरे,डॉ.वर्षा वैद्‍य आणि महाविद्‍यालयातील सर्व प्राध्‍यापकानी व कर्मचारी यांनी कार्य केले.या कार्यक्रमाला महाविद्‍यालयातील सर्व कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्‍यार्थी उपस्‍थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …