*शाळेत दारु च्या नशेत असलेल्या मुख्याध्यापकला खापा पोलिसांनी केली अटक*
*प्रकाश पराते यांच्या आकस्मिक भेटीने फुटले दारुड्या शिक्षकाचे बींग*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*
सावनेर पचांयत समिती उपसभापती प्रकाश पराते हे आपल्या सावनेर पचांयत समिती क्षेत्रात शिक्षणाच्या परीस्थिती चे निरीक्षण करायला गेले असता, बडेगाव सर्कल मधील सर्रा या गावातील उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुरेश काबंडी दारु च्या नशेत आढळून आला, मुख्याध्यापक ला दारु च्या नशेत असल्याचे पाहून उपसभापती पराते अचंबित झाले व त्यांनी खापा पोलिस स्टेशन ला फोन लावून बोलावून घेतले आणि मुख्याध्यापकाची तक्रार केली, शाळेची पाहणी करीता उपसभापती प्रकाश पराते यांच्या सोबत बडेगाव सर्कल च्या पंचायत समिती सदस्या भावना चिखले ,शिक्षक तज्ञ गौतम,व वाकोडी सर्कल चे कांगेस अध्यक्ष
नितीन निर्मल सोबत होते , मुख्याध्यापक सुरेश काबंडी यांनी स्वता दारु पेवुन असल्याचे लेखी कबुली देऊन या नंतर शाळेत दारु पेवुन येणार नाही असल्याचे म्हटले , खापा पोलिसांनी मुख्याध्यापक ला अटक केली असुन ब्लड
सॅम्पल टेस्टिंग ला पाठविले आहे, शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असल्याचे आपण बातमी द्वारे ऐकत आहोत, सर्रा गावातील उच्च प्राथमिक शाळेत मुलां मुली सहीत विद्यार्थ्यांची संख्या 25 च्या जवळ पास असुन शिकवायला मुख्याध्यापक सह दोन शिक्षक आहे, एक शिक्षक बरेच दिवस पासुन गैरहजर आहे तर मुख्याध्यापक दारु च्या नसेत सापडले, दारु च्या नशेत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल हे समजण्या सारखे आहे, उपसभापती प्रकाश पराते शाळेची पाहणी
करायला गेल्याने हि बाब लक्षात आल्याने बरे झाले अन्यथा भविष्यात मोठी घटना ही घडली असती.शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवीतो मात्र शाळेत दारु पेवुन शिक्षक शिकवायला लागले तर विद्यार्थ्यांचे काय होईल, उपसभापती प्रकाश पराते शाळेची पाहणी करायला गेल्याने हि बाब लक्षात आली, प्रकाश पराते यांना उपसभापती होवुन 15 दिवसच झाले त्यांनी एका आठवड्या पासुन क्षेत्रातील शाळांचा दौरा करीत आहे ,अशातच हा प्रकार त्यांना दिसुन आला,