महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे हार्डवेअर मेन्टेनन्स व बेसिक नेटवर्किंग प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न
*नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेड़ा– येथे हार्डवेअर व बेसिक नेटवर्किंगचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. नरेश तरारे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. राजुजी शिंगम ह्यानी भूषविले. अध्यक्षीय भाषणात तरारे सरानी सांगितले की सगनक काळाची गरज आहे. म्हणून सगनक सर्वांनी शिकले पाहिजे. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 15 दिवस हार्डवेअर व बेसिक नेटवर्किंगचे प्रशिक्षण शिबीर आशिष भालेराव, सुनिल ऊके, पुनम सय्यामे हानी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्री. प्रकाश कोहळे हानी केले. सर्व प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र, बॅग, पुस्तक देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. शालु टेकाडेनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर, नलिनी बेडेकर प्रतिभा मानवटकर मोरे ताई मोरे सर गुडिया राय यांनी अथक परिश्रम घेतले.*