*लिटर अर्धा लिटर डिझल पेट्रोल वाचविण्याचा लोभ बेतू शकतो शेकडो विद्यार्थ्यांच्या जिवीतेवर*-*राँग साईड ने धावतात शालेय वाहने*-*के जाँन पब्लिक स्कूल (काँनव्हेन्ट) आजनी चा प्रताप*

*लिटर अर्धा लिटर डिझल पेट्रोल वाचविण्याचा लोभ बेतू शकतो शेकडो विद्यार्थ्यांच्या जिवीतेवर*

*राँग साईड ने धावतात शालेय वाहने*

*शालेय प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष तर पालक वर्ग उदासीन*

*के जाँन पब्लिक स्कूल (काँनव्हेन्ट) आजनी चा प्रताप*

मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर

*सावनेरः सावनेर शहरापासून जवळपास तीन की.मी.अंतरावर सावनेर खापा रोडवर स्थीत के जाँन पब्लिक स्कुल येथे विद्यार्थ्यांना ने आन करण्याकरिता शालेय प्रशासन व पालक वर्गाने सदु्ष्य डोळेझाप केल्याने केव्हाही मोठा अपघातास पुढे जाऊण अनेक निरागस विद्यार्थ्यांच्या जिवीतेवर बेतन्याची शक्यता नकारता येत नाही*


*के जाँन पब्लिक स्कूल या शाळेत जवळपास शेकडो विद्यार्थी विद्यार्थींनी असुन सदर विद्यार्थ्यांना ने आन करण्याकरिता बस,आटो,मीनीबस,टँक्सी चुकीच्या मार्गाने म्हणजेच राँग साईड ने धावत शाळेत जातात व शाळा सुटल्या नंतर परतीच्या मार्ग ही तश्याच पध्दतीने सर केल्या जातो*

*के जाँन पब्लिक स्कूल ही शाळा सावनेर मनसर या महामार्गावर सावनेर शहरापासुन अंदाजे तीन कीलोमीटर अंतरावर असुन सावनेर खापा मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूने आहे सदर मार्ग हा महामार्ग असल्याने सावनेर मार्गाने शाळेत जाणारे शालेय वाहनांना आजनी फाटा येथे आजनी गावाला जाणार्या रस्त्याला खंड आहे येथूनच जवळपास दीड़ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजुला के जाँन पब्लिक स्कूल ही शाळा आहे.व शाळेला सरळ मार्गाने वाहने न्यायचे असल्यास जवळपास तीन की.मी.पुढून कोदेगाव या गावा पासून परत तीन किलोमीटर असे सहा कीलोमीटर अंतर वाचविन्याकरिता वाहन चालक चक्क राँग साईडने शाळेत पोहचतात तर शाळेला सुटी झाल्यावर खापा मार्गाने धावनारे वाहने आजनी फाट्या पर्यंतचे दिड़ कीमी अंतर वाचविण्याकरिता कोदेगाव पर्यंतचे तीन की.मी मार्ग राँग साईडने राजरोस पणे धावतात व खाजगी वाहनांना शाळा परिसरात येण्याची परवानगी नसल्याने शाळा सुरुवात व सुट्टीच्या वेळी शाळेच्या गेट पुढील खाजगी वाहनांची गर्दी यामुळे सदर मार्ग आधीच अरुंद होऊण जातो*


*सदर मार्गावर पडणारे खापा शहरातील कन्हान नदीच्या पात्रातील वाळूचे मोठ्या प्रमाणात रेतीचे जड वाहनांने सावनेर,काटोल,कळमेश्वर,अमरावती व नागपूर करिता भरधाव परिवहन केल्या जात आहे तर सोबतच कमी वेळात जास्त फेर्या लागाव्या याकरिता शर्तीचे प्रयत्न होने नवीन बाब नाही तर सदर मार्गावरुण जबलपूर अमरावती व वाडी नागपूर ला जाणार्या भारवाहक वाहनांची सदर मार्गावर सततची गर्दी असते अश्यात लिटर अर्धा लिटर डीझल पेट्रोल वाचविण्याच्या नादात शाळा प्रशासन व खाजगी शालेय वाहने विद्यार्थ्यांच्या जिवीतेशी खेळत असल्याने केव्हाही मोठी दुर्घटना होऊण अनेको अनेक विद्यार्थ्यांच्या जिवीतेवर बेतन्याची शक्यता नाकारता येत नाही*


*सदर बाबींवर स्थानिक उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी,सोबतच राज्य महामार्ग परिवहन विभाग स्थानिक पोलीस विभाग आदिंनी वेळीच लक्ष दिले नाही तर केव्हाही मोठी अप्रिय घटना घडून मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सदु्ष्य चित्र आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …