*ब्रेकींग न्यूज*
*बंधारे बांधकामात ढिगारा कोसळून चार महिलांचा दुर्दैवी मु्त्यू तीन जखमी*
*सावनेर पो.स्टे हद्दीतील पटकाखेडी आदासा शिवारातील घटना*
*कंत्रटदाराने शवविच्छदन न करता संशयित रीत्या तीन शवांना सीवनी मध्यप्रदेश केले रावाना*
*सदर घटनेची सुचना सावनेर पोलीसांना सहा तास न देण्यामागील रहस्य काय…?*
*तर एका मु्तकावर सावनेर येथे शव विच्छेदन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत आशीष लोधी व सुरज सेलकर सावनेर*
*सावनेर: पोलीस स्टेशन हद्दीत सावनेर कळमेश्वर रोडवरील आदासा पटकाखेडी शिवाराजवळ स्मॉल स्केल एरिकेगन कंपनी नागपूरचा माध्यमातून मंदिप चोधारी राहणार नागपूर यांचा मार्फत पाटबंधारे विभागाकडून नाल्याचा बंधाऱ्याचे काम सुरू असताना दिनांक 21 फरवरीला सकाळी अंदाजे 8 वाजताचा सुमारास मातीचा मलबा खसल्याने 4 महिला मजुरांचा जागीच मुत्यु झाला. मृतक मध्ये वर्षा शामलाल मडावी 26 वर्ष रा.टाकला,ता.बरधाट जी.सीवनी,अनुसया बाई हिरदे टेकाम वय 45, रा.बरधट जी.सीवनी,सुनीता कैलास वय 35,बरधट जी.सिवनी, रामप्यारी उदयसिंग काकोरिया वय 18 बरधट जी.सीवनी मध्यप्रदेश असे मृतकांचे नावे आहे.तर 3 महिला कामगार जखमी झाले असून त्यांची नावे अजून पर्यत कळू शकली नाही.*
*स्थानिक ठेकेदार यांनी मृतक 3 कामगारांना घटना स्थळवरून सरळ तहसील बरघाट जिल्हा शिवानी येथे सावनेर पोलीसांना सुचना न देता त्यांचा परिजनाकडे एक गाडी करून रवाना केले व जखमी महिलांना उपचाराकरिता नागपूर येथे रवाना केले. सावनेर पोलिसांनी ठेकेदार मंदीप चौधारी आणि इंजीनीयर जगदीश प्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली असून आरोपीवर अप.क्र 96/20 304 अ, 337, 34 भादवी गुन्हा नोंदवून तपासात घेतला आहे.*
*मिळालेल्या महितुनसार सादर बंधारेकामावर 25 ते 30 मजूर मागील 10 दिवसापासून कामावर असून सदर ठिकाणी बंधारेचा कामाकरिता 20 फूट लांबीचे 8 ते 9 फूट खोलीचे कार्य पोकलेंड चा मद्यमातून केले असून सुरक्षेचे कुठलेच उपाय योजना न करता सदर खड्यात निष्पपाप मृतक व जखमी महिला उतरून कामाला लागण्यापूर्वीच मोठा मातीचा ढिगारा त्यांचा अंगावर पडून मृत्य झाला.सदर कार्य हे ठेकेदारांनी सुरक्षतेचे कोणतेच उपाय योजना न केल्याचे आरोप प्रत्यक्ष दर्शी कडून होत असून सकाळी 8 चा सुमारास घडलेल्या घटनेची माहिती ठेकेदाराने पोलीस स्टेशन सावनेर ला जवळपास 6 तासानंतर दुपारी 2-00 चे दरम्यान दिल्याने सदर घटनेस संशयास्पद रीतीने बघितल्या जात असून त्यात ठेकेदाराने हे प्रकरण रफा दफा करण्याचे पुरेपूर प्रयत्न केल्याचा आरोप केला जात.*
*मु्तक वर्षा मडावी हिच्या पार्थीवावर प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे शवविच्छेदन करुण परिवाराच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सावनेर पोलीस स्टेशन चे पो.नी.अशोक कोळी यांनी देत पुढील तपास करत असुन सदर घटनेची सुचना ठेकेदाराने उशिरा का दीली…?,तीन मु्तकाचे शव परस्पर त्यांच्या मुळ गावाला का रवाना करण्यात आले…?,या मागचा ठेकेदाराचा हेतू काय…?,ठेकेदाराने बांधकाम स्थळी सुरक्षेचे कोणते उपाययोजना का केली नाही सारखे अनेक प्रश्न सदर घटनेतून उदायास येत असुन या चा निवडा लागने पुढील तपासून अपेक्षित आहे.*