Breaking News

*तायवाडे महाविद्यालयात उन्मेष महोत्सव रंगला !*

*तायवाडे महाविद्यालयात उन्मेष महोत्सव रंगला*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
महादूलाकोराडी येथील तायवाडे महाविद्यालयात उन्मेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले यात विशेषतः निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वाद विवाद स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा , पाककला स्पर्धा ,मेहंदी स्पर्धा , गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वादविवाद स्पर्धेत भारताच्या लोकसंख्या वाढीसंदर्भात त्याच्या कारणमिंमासेची चिकित्सा केली. व अनेक महनीय विचार विद्यार्थ्यांनी मांडले.भित्ती चित्रा च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भावी नव्या भारताचे चित्र आपल्या कुंचल्यातून रेखाटले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील महामानवांनी सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य कशा पद्धतीने केले आणि त्यासाठी आपल्या जीवाचे रान कसे पेटविले यासंदर्भात अत्यंत मोलाची ची माहिती दिली. निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात अत्यंत चिंतनगर्भ व सखोल विचार मांडले. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रबोधनात्मक ,व्यासंगी आणि व्यापक विचारवैभवाला प्रकट केले .यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रतिभाशाली, चिंतनशील कक्षा अधिकाधिक रुंदावत गेल्या. यासोबतच विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गटनिहाय पद्धतीने वेगवेगळे पदार्थ घरून तयार करून आणले. आणि आणि ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विकत घेवून आस्वाद घेतला, त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ झाला. या उपक्रमातून त्यांना एक व्यावसायिक नजर आली ,अर्थ व्यवसायाचे तंत्र गवसले आणि विद्यार्थ्यांचा व्यवसाय करण्याच्या संदर्भातील सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला.या सर्व उपक्रमा नंतर बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे संस्कृतीक समितीच्या सहसमन्वयक डॉ.वर्षा वैद्य आणि संस्कृतीक समितीचे समन्वयक डॉ.कोमल ठाकरे उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्यील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन याच्यापलीकडे जाऊन आपल्या सुप्त शक्तींना, अंगभूत कलागुणांना विकसित करण्यासाठी ,आपल्या सुप्त कला कौशल्यांना प्रकट करण्यासाठी महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सांस्कृतिक पिठाचा यथायोग्य उपयोग विद्यार्थ्यांनी करावा आणि आपल्या आयुष्यात साहित्य,कला, संस्कृती आणि प्रतिभावंतांचे विचार अंगभूत करावे असा महत्वपूर्ण विचार प्रकट केला याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे जीवन मूल्य ,शैलीचे तंत्र विकसित करण्यासाठी सदैव कार्यरत असावे असा शुभ संकेत दिला. याप्रसंगी डॉ.वर्षा वैद्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन ते साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तित्व विकासाची उंची कशी काढावी यासंदर्भात महनीय विचार मांडले याप्रसंगी डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद आणि सर्व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …