*पटकाखेडी आदासा मार्गावरील निर्माणाधिन कालवा बांधकामात चार महिला कामगारांच्या मु्त्यू प्रकरणी*
*कंत्रटदार,अभियंता व स्माँल स्केल एरीगेशन कंपनी संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविन्याची समाजसेवी किशोर ढुंढेले यांची मागणी*
*आखिल भारतीय मजदुर काँग्रेस (इंटक सलग्न) नव नियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी खासदार गेव्ह आवारी,अ,भा.मजदुर संघ जिल्हा अध्यक्ष भोला बैसवारे यांच्या उपस्थितीत पोलीस निरिक्षक कोळी यांना निवेदन सादर*
सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर
*सावनेरः सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पटकाखेडी आदासा मार्गावरील निर्माणाधिन कालव्याच्या बांधकामात दि.21 फेब्रुवारी 2020 ला मातीचा ढीगारा कोसळून त्याखाली दबून चार महिला कामगायांचा मु्त्यू तर तीन महिला कामगार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असता सदर घटनेत कांत्रटदार व अभियंता यांनी संगनमत करुण प्रकरण दाबण्याचे कटकास्थान केल्याचे निदर्शनास येत असुन सदर कंपनी व्यवस्थापन, कात्रटदार व अभीयंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून पिडित परिवारास तत्काळ आर्थिक मदत मीळावी या करिता समाजसेवी किशोर ढुंढेले यांनी आखिल भारतीय मजदुर काँग्रेस (इंटक सलग्न) नव नियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी खासदार गेव्ह आवारी,अ,भा.मजदुर संघ जिल्हा अध्यक्ष भोला बैसवारे यांच्या उपस्थितीत पोलीस निरिक्षक कोळी यांना निवेदन सादर खरुण मागणी केली आहे*
*यात घटनास्थळावर मातीचाढीगारा कोसळून चार महिलांचा मु्त्यू तर तीन महिला गंभीर झल्या असून सदर घटनेची सुचना सावनेर पोलीसांना सहा तास उशिरा का देण्यात आली…?,घटनेची सुचना स्थानिक पोलीसांना न देति मु्तदेह घटना स्थळावरुण हालवून त्यांचे उत्तरीय तपासणीन करता परस्पर वाहनांनी मुतकाच्या गू्ह गावी नेण्याची कांत्रटदार व अभियंते यांनी घाई खरण्याचे कारण काय…?,चार महिला कामगारांचा मु्त्यू सदर घटनेत घटनास्थळी झाला असुन तीन गंभीर जखमींना तीन की.मी.अंतरावर असलेल्या प्राथमिकआरोग्य केद्र सावनेर येथे प्रथमोपचारा खरिता न अनता नागपूर येथे 36 की.म.अंतरावर व खाजगी दवाखान्यात हलविण्याचे कारण काय…?,चार मु्तकापैकी तीन मु्तकाचे शव त्यांच्या मुळ गावी परस्पर रवाना करुण फक्त एक महिला मु्तकाची संदेहास्पद उत्तरीय तपासणी सावनेर येथे करण्या मागचा हेतू काय…?,सदर घटनेची माहिती तात्काळ सावनेर फोलीस,पाटबंधारे विभाग कळमेश्वर यांना का देण्यात आली नाही…?,घटनेतील चारही मु्तकास नागपुरच्या खाजगी दवाखान्यात नेऊण येथूनच शवांची उत्तरीय तपासणी न करता परस्पर मध्यप्रदेश च्यि सीवनी जिल्हात पाठवीण्या मागचा हेतू काय…?,नागपूर च्या खाजगी रुग्णालयातमु्तक व गंभीर जखमींना उपचारासाठी आणले असता सदर दवाखान्यातील डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांन पासुन लपविण्याचे कारण काय…?अश्या अनेक संदेहास्पद बाबींचा तपास अधिकारी व पोलीस निरीक्ष यांनी तपास करुण सदर प्रकरण दडपयाचा व बांधकाम स्थळी कोणतेही सुरक्षेचे उपाययोजना न करता जाणीवपुर्कक सदर घटना घडल्याचा आरोप समाजसेवी किशोर ढुंढेले यांंनी आपल्या निवेदनातून करत कंपनी संचालक,कात्रटदार व अभियंता यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोदवून पीडीत परिवारास तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरिक्षक अशोक कोळी सह मा.उद्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन,मा.सुनील बाबू केदार दुग्ध विकास व पशू संवर्धन, क्रीडाव युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन,मा.जल संवर्धन मंत्री महाराष्ट्र शासन,मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय नागपूर, मा.पोलीस अधिक्षक साहेब नागपूर जिल्हा ग्रामीण यांना निवेदनातून करण्यात आली आहे*
*सदर निवेदनावर माजी खासदार व नव नियुक्त अखिल भारतीय मजदुर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गेव्ह आवारी व जिल्हा अध्यक्ष भोला बैसवारे व अविनाश लोखंडे यांनी ठाणेदार यांच्याशी चर्चा करुण पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली असुन घटनास्थळी भेट देऊण सदर प्रकरातील गांभीर्य जाणून घेत सदर दुखद् घटनेत अखिल भारतीय मजदुर काँग्रेस (इंटक संलग्न) पिडित परिवाराच्या दुखात सहभागी असुन त्यांना तात्काळ आर्थिक मदत व न्याय मीळावा तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी याकरीता मा.जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन व संबंधित विभागास निवेदन सादर करणार असल्याची माहीती याप्रसंगी दीली*