माता रमाई जयंती उत्सव साजरा

बुद्ध भीम गित गावून कार्यक्रंमाची सांगता

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे
दि. २२/२/२0२0ला दि बुध्दिस्ट सोसायटी आँफ इंडिया. भारतीय बौध्द महासभा शाखा वरोरा.(अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब) अध्यक्ष अँड आदेश अलोने साहेब यांच्या माध्यमातून माता रमाई जंयती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम महापुरुष यांना माल्यार्पण करून. सांयकाळी 5.00 वाजता नरेशजी चांदेकर व त्यांच्या संच यांनी बुध्द भीम गित गावुन अनुयायी यांना 7.00 वाजेपर्यंत मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या व्याख्यानाला सुरुवात महापुरुषानां माल्यार्पण. व दिप प्रज्वलित करून झाली.
अध्यक्ष आयुषमती अँड .प्रिया पाटील होत्या. उद्घाटक आयुषमती प्रा.डॉ. विजया गेडाम होत्या. प्रमुख पाहुणे आयुषमती हर्षना बागडे होत्या. प्रास्ताविक आयुषमती सिंधू देवगडे यांनी केले. संचालन आयुषमती प्रतिभा जुलमे यांनी केले. आभार प्रदर्शन आयुषमती अनुताई विनोद खोब्रागडे यांनी केले.
यामध्ये पाहुन्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन. आदेश अलोने साहेब. विनोद खोब्रागडे पटवारी साहेब. भाऊराव निरंजने साहेब.अनुताई खोब्रागडे.यांचे सत्कार आयुषमान दशरथ शेंडे. कुंदन बुजाळे.कांबळेजी.यांच्या मार्फत करण्यात आले.
या कार्यक्रमात माता रमाई यांच्या जिवनावर प्रभाव टाकन्यात आले. तसेच चालू घडामोडींवर. C A A,N R C,N P R, समंधात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज