*भारतीय जनता पार्टीचे,तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन*

रामटेक प्रतिनिधी- ललित कनौजे
रामटेकः महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा पक्षतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. महिलांवर वाढता अत्याचार थाम्बविण्याकरिता कडक कायदा करण्यात यावा,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करून ७/१२कोरा करून द्यावा, नागपूर DPDC चा २६५ कोटी चा निधी परत करावा, सरपंच,नगराध्यक्ष यांची निवडणूक सरळ लोकांमधुनच व्हावी,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल धारकांना उर्वरित निधी त्वरित मिळावा,अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करून आवास योजनेचा लाभ द्यावा, रामटेक नगरपालिकेच्या 8 कोटी रुपयांच्या निधी ला दिलेली स्थगिती त्वरित उठवावी, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेली मदत मिळायला पाहिजे अश्या अनेक मागण्या साठी भाजप तर्फे रामेटकच्या तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष संजय मूलमुले,राजेश ठाकरे,सतिश डोंगरे, मनसाराम अहिरकर,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल किरपान, तेजपाल सोलनकि, बालचंदजी बादुले,शिल्पा रणदिवे, अलोक मानकर, कविता मुलमुले, रत्नमाला अहिरकर, संजय बिसमोगरे,प्रभाकर खेडकर, रामानंद अडामे,वनमाला चौरागडे,उज्वला धामगाये,लता कामळे, पद्मा ठेंगरे,चित्रा धुरई,अनिता टेटवार,विवेक तोतडे , उमेश पटले , पप्पू यादव,डॉ विशाल कामदार,नंदकिशोर कोहळे, रजत गजभिये,स्वप्नील खोडे,सुभास मानकर,योगेश मात्रे,अनुप राजूरकर,बाल्या हटवार सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज