Breaking News

नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही – एकनाथ शिंदे

नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही

– एकनाथ शिंदे

मुंबई: नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना दिनांक 1 जानेवारी 2006 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2010 या कालावधीतील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही निर्णय घेऊन 1 डिसेंबर 2010 पासून सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. त्यामूळे आता कोणतीही थकबाकी देय नाही, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्ती वेतन, थकित महागाई भत्ता देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य नागोराव गाणार, अनिल सोले, भाई जगताप आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …