वाकेश्वर येथे परमात्मा एक सेवक सम्मेलन संपन्न
समाजातील सर्व लोकांनी व्यसन मुक्ती कार्य करावे
– गजानन येरणे
विशेष प्रतिनिधि
धर्मापुरी– वाकेश्वर येथे 22 फेब्रुवारी ला भव्य सेवक सम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन परमात्मा एक सेवक प्रचारक गजानन येरणे बेरडेपार यांचा हस्ते करण्यात आले. द्विप प्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदावजी , मातोश्री वाराणसी आई यांचा प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरेश्वर सार्वे सचिन ब.प.प. ए.से. मंडळ मोहाडी ,उद्घाटक गजानन यरणे प्रचारक परमात्मा एक सेवक, प्रमुख पाहुणे विनोद दमाहे नंदापुरी, नामदेव मचाळे, रमेश रकतसिंगे, जितेंद्र सरोदे नगरधन, वासुदेव बंधाटे हमलापुरी, धर्मराज बावनकुळे, बंडू देशमुख, तुलाराम डांगरे तारसा, हिरामण शेंडे अडेगाव, आनंदराव नाटकर बेरडेपार, राजू माटे, एकनाथ जिभकाटे, फत्तु कारेमोरे कोदामेंढी, रामदास लिल्हारे खुटसावरी, आदी मान्यवर उपस्थित होते .
संचालन अनिल सपाटे तर आभार टिकेश्वर सपाटे यानी मानले.
सायंकाळची प्रार्थना करून चर्चा बैठक समाप्त करण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचे सर्व पाहुणे सेवक सेविका व सर्व गावकरी मंडळीनी आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन वाकेश्वर येथील सर्व सेवक , सेविकांनीठ केले. यात विनोद पंचबुधे, मुनेश्वर सपाटे, नारायण खरवडे, फुलदास बावणे, पुनाजी सपाटे, धर्मेन्द्र कनोजे, किरण सपाटे, अश्विन चवळे, विरेंद्र सपापे, रोहित माटे, महादेव चवळे, आकाश तांडेकर, विशाल सपाटे, महेंद्र चवळे, अरूण गोमासे, कार्तिक चवळे, निकेश मोहुर्ले , लक्ष्मण कुंडकार, स्वप्नील सपाटे, स्वंरात सपाटे आदि सर्वांचा समावेश होता